
थोडक्यात महत्वाचे :
रायबरेलीत दलित युवकाची हत्या: राहुल गांधींच्या मतदारसंघात दलित युवक हरिओम यांची चोरीच्या संशयावरून मारहाण करून हत्या करण्यात आली. मारहाणीत युवकाने राहुल गांधींचे नाव घेतले, पण हल्लेखोरांनी थांबले नाही.
राजकीय वादाला तोंड: काँग्रेसने आरोप केला की हल्लेखोर “आम्ही बाबा वाले” असे म्हणत होते आणि ही घटना दलितांविरोधातील वाढत्या अत्याचारांचे उदाहरण आहे. राहुल गांधींनी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला.
पोलिस कारवाई आणि प्रतिक्रिया: पाच जणांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने योगी सरकारवर दलित सुरक्षेच्या प्रश्नावर तीव्र टीका केली आहे.
Rae Bareli Murder Case: Victim Mentioned Rahul Gandhi’s Name : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या रायबरेली या मतदारसंघातील धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दलित युवकाला मारहाण करत निघृण हत्या करण्यात आली आहे. मारहाण सुरू असताना या युवकाने मदतीच्या आशेने राहुल गांधींचे नाव घेतले. त्यानंतरही हल्लेखोर थांबले नाहीत. आम्ही ‘बाबा’वाले असल्याचे सांगत युवकाची हत्या करण्यात आल्याच दावा काँग्रेसने केला आहे.
हत्येची ही घटना मागील आठवड्यात घडली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ही घटना समोर आल्यानंतर खुद्द राहुल गांधी यांनी संबंधित युवकाच्या कुटुंबीयांसी फोनवरून संवाद साधत त्यांना आधार दिल्याची माहिती काँग्रेसने दिली आहे. आज उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रत्यक्ष या कुटुंबाची भेट घेतली.
रायबरेलीतील युवक हरिओम यांची 2 ऑक्टोबरला हत्या करण्यात आली आली. चोरी केल्याच्या संशयावरून काही जणांनी त्यांना मारहाण केली. मारहाण होत असताना हरिओम यांनी राहुल गांधी यांचे नाव घेतल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून काँग्रेससह समाजवादी पक्षाने योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हल्लेखोरांचे 'बाबा' म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
काँग्रेसकडून योगी सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांला मोकळे सोडले आहे. दलितांविरोधातील गुन्ह्यांबाबत त्यांनी डोळे बंद केले आहे. त्यामुळेच या गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
राज्यात कायद्याचे राज्य संपून जंगलराज सुरू झाल्याची टीका समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. तसेच इतर आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी केली जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
Q1: रायबरेलीत कोणाची हत्या झाली?
A: दलित युवक हरिओम यांची 2 ऑक्टोबर रोजी हत्या झाली.
Q2: मारहाणीत राहुल गांधींचे नाव का घेतले गेले?
A: हरिओम यांनी मदतीच्या आशेने राहुल गांधींचे नाव घेतले, पण हल्लेखोरांनी थांबले नाहीत.
Q3: काँग्रेसचा आरोप काय आहे?
A: काँग्रेसचा दावा आहे की दलितांविरुद्धचे अत्याचार योगी सरकारच्या काळात वाढले आहेत.
Q4: पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?
A: पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.