Uttar pradesh News : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गदारोळ झाला. सभेला जमलेली लोकांची गर्दी अनियंत्रित झाली. बॅरिकेड्स तोडून लोक स्टेजवर पोहोचले. पोलिसांनी लाठीमार केला असता चेंगराचेंगरीची परिस्थितीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या प्रसंगावधान दाखवून राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी भाषण न करताच सभेतून निघून गेले.
फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पाडिला महादेव येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. इंडिया आघाडीच्या रॅलीत राहुल गांधी आणि अखिलेश यादव सभेला आल्याची माहिती मिळताच मोठी गर्दी जमली होती. राहुल गांधी आणि अखिलेश यादव हेलिकॉप्टरने या ठिकाणी आले होते. तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली. पाहता पाहता ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राहुल गांधी-अखिलेश यादव स्टेजवर पोहोचताच जमावाने बॅरिकेड्स तोडून आत प्रवेश केला. सर्व कार्यकर्ते स्टेजवर चढले. यानंतर हे दोन्ही नेते संतापले. ते मंचावरूनच निघून गेले. सपा आमदार मानसिंग यादव यांनी या गदारोळाचा आरोप भाजपवर केला आहे. जाहीर सभेला पोहोचलेल्या प्रचंड जनसमुदाय पाहून भाजपच्या (BJP) दबावातून या सभेला योग्य नियोजन पुरवले गेले नाही, असा आरोप केला आहे.
अखिलेश यादव आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) येताच जमावाने आधी हेलिपॅडजवळील बॅरिकेड्स तोडल्याची माहिती आहे. यानंतर राहुल गांधी आणि अखिलेश यादव स्टेजवर पोहोचल्यावर सर्वप्रथम 'डी' समोरील बॅरिकेडिंग तोडून जमाव आत घुसला. दरम्यान, आजूबाजूचे बॅरिकेड्स तोडण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र यश मिळू शकले नाही.
एकमेकांना धक्का देऊन, ढकलून लोक पुढे सरकू लागले, तेव्हा मंचावरून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले, पण त्याचाही उपयोग झाला नाही. व्हीआयपी नेत्यांना कोणतीही अडचण येण्याआधीच राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अखिलेश यांनी कोणतेही भाषण न करता परतण्याचा निर्णय घेतला. सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी घेरलेल्या दोन्ही नेत्यांना हेलिकॉप्टरमध्ये नेण्यात आले आणि दोघेही परतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.