NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

Ajit Pawar Vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार? याची सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली आहे. मंगळवारी या याचिकेवर कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama

Pune News : दहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीचे दोन पक्ष तयार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा नवीन पक्ष अस्तित्वात आला आहे. तुतारी वाजविणारा माणूस असे निवडणूक चिन्ह या पक्षाला मिळाले असून त्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांना सामोरे जात निवडणुका देखील लढविण्यात आल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविली आहे.

राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुप्रिम कोर्टात (Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र सध्या सुरू असेलेले कोर्टाचे कामकाज आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे या याचिकेवर कोणतीही सुनावणी होऊ शकली नाही. या याचिकेवरील सुनावणी दोन महिने ढकलण्यात आली असून यावर आता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Ajit Pawar
ED Chargesheet News : ‘ईडी’ पहिल्यांदाच राजकीय पक्षाला करणार आरोपी; कोर्टातच दिली माहिती...

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले घड्याळ तसेच पक्षाचे नाव काही अटी घालून वापरण्याची परवानगी कोर्टाने अजित पवार यांना दिली आहे. सध्या अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असून निवडणुकीमध्ये पक्षाचे चिन्ह वापरण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन त्यामध्ये घड्याळ चिन्हाबाबत कोर्टात सुनावणी सुरू असल्याचा मजकूर प्रसिद्ध करण्याच्या सूचना अजित पवार यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार याची जाहीरात देखील लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रसिद्ध करण्यात आली होती.

सध्या लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या काळात आज (मंगळवारी) होणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.सुप्रिम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि घड्याळ चिन्हाबाबतचे प्रकरण 44 नंबरला लिस्टेड होते. मंगळवारी कोर्टाचे काम 16 व्या प्रकरणापर्यंत चालल्याने हे प्रकरण आज बोर्डावर आलेच नाही. त्यामुळे त्यावर सुनावणी होऊ शकली नाही. कोर्टाला आता उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत. त्यामुळे या सुट्ट्या संपल्यानंतरच या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Lok Sabha Election 2024: '...त्या आता हवेत उडू लागल्या आहेत!' मनसेकडून सुषमा अंधारे यांच्या टीकेवर पलटवार

न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती के.व्ही.विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार होती. राष्ट्रावादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह निवडणूक आयोगाने एकतर्फी पद्धतीने अजित पवार यांना दिलेले आहे, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुप्रिम कोर्टात सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे. मंगळवारी ही याचिका सुनावणीसाठी न आल्याने जुलै च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या प्रकरणाची सुनावणी लांबली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात सुप्रिम कोर्ट यावर काय निर्णय देणार याकडे आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Swati Maliwal News : अखेर ‘आप’ची कबुली; स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या PA वर होणार कारवाई  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com