
Congress Leaders at Kumbh : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यास दररोज लाखो भाविक पोहचत आहेत. यामध्ये अगदी सर्व सामान्यांपासून ते व्हीव्हीआयपी व्यक्तींचाही समावेश आहे. आतापर्यंत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांसह अनेक राज्यांच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी महाकुंभमेळ्यास हजेरी लावत, तेथील संगमात पवित्र स्नान केले आहे. तर आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील महाकुंभ मेळ्यास जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, काँग्रेसचे(Congress) हे दोन्ही दिग्गज नेते 16 फेब्रुवारी रोजी प्रयागराजला पोहचणार आहेत आणि संगमात स्नाही करणार आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय राय यांनी यावृत्ताची पुष्टी केली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या प्रयागराज दौऱ्याचे संपूर्ण नियोजन झाले आहे. यादरम्यान ते काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचीही भेट घेणार आहेत.
अजय राय यांनी म्हटले आहे की, काँग्रेस नेते कुंभमेळ्यात याआधीही गेलेले आहेत. आमच्या नेत्या प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) आणि त्यांच्या आधीही काँग्रेसचे काही नेते कुंभ मेळ्यास गेलेले आहेत. आता आम्ही सर्वजण कुंभ मेळ्यास जाणार आहोत आणि पवित्र स्नानही करू व हर-हर महादेव असा जयघोष करणार आहोत. आम्ही महाकुंभ मेळ्यास नक्कीच जाणार आहोत.
महाकुंभ मेळ्यात काँग्रेस सेवा दलाद्वारे सेक्टर -15, तुलसी मार्गावर एक मोठे सेवा शिबीर लावले गेले आहे. राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी याच सेवा शिबिरातील सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतील आणि महाकुंभ मेळ्यात केल्या जात असलेल्या सामाजिक आणि धार्मिक कार्याची माहिती घेतील.
तर काँग्रेस नेत्यांच्या मते, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत जवळपास एक हजार काँग्रेस कार्यकर्ते संगमात स्नान करणार आहेत. आधी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या आमदार मुलासह संगमात स्नान केले. तसेच, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी महाकुंभ मेळ्यास हजेरी लावलेली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.