Donald Trump on Bangladesh : "काय करायचं ते..." PM मोदींच्यां भेटीनंतर ट्रम्प यांनी बांगलादेशबाबत भारताला दिला 'फ्री हॅन्ड'

PM Modi-Donald Trump meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह एलॉन मस्क यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मोदींनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
Narendra Modi And Donald Trump
Narendra Modi And Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

Modi US Visit 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह एलॉन मस्क यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मोदींनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

युद्धाबाबत भारत तटस्थ नसून भारत शांततेच्या बाजूने उभा असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यात वॉशिंग्टन येथे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत भारत-अमेरिका संबंधांसह व्यापारावर चर्चा झाली. यावेळी ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धासह बांग्लादेशातील परिस्थितीवर देखील भाष्य केलं.

तसंच दोन्ही नेत्यांच्या या भेटीत जगभरात चर्चेत असलेल्या बांगलादेशच्या (Bangladesh) मुद्यावर चर्चा झाली. यावेळी ट्रम्प यांनी बांग्लादेशबाबत एक मोठं विधान केलं. ते म्हणाले, बांग्लादेशातील संकटात अमेरिकेचा सहभाग नाही. बांगलादेशचा मुद्दा कसा सोडवायचा ते मी पंतप्रधान मोदींवर सोडतो. बांग्लादेशबाबतचा सर्व निर्णय मोदी घेतील. बांग्लादेश संबधात काय करायचं ते मोदी ठरवतील."

Narendra Modi And Donald Trump
G Kishan Reddy on Congress : ''...यावरून काँग्रेसच्या अधःपतनाची सुरुवात झाल्याचे दिसून येते'' ; केंद्रीयमंत्र्यांचं मोठं विधान!

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता भारताला बांगलादेशबाबत निर्णय घेण्यासाठी मोकळीक मिळाल्याचं बोललं जात आहे. सध्या बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदुंवर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू आहेत. शिवाय तिथली राजकीय परिस्थिती अस्थिर झाल्यामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना या बांगलादेश सोडून भारतात आश्रयाला आल्या आहेत.

तर शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी बांगलादेशकडून करण्यात येत असतानाच ट्रम्प यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. दरम्यान, या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला डोनाल्ड ट्रम्प यांनी हिरवा कंदील दिला आहे.

Narendra Modi And Donald Trump
Vijay wadettiawar : भाजप नेत्यांच्या डोक्यात हवा गेली; वडेट्टीवारांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर

तसंच अमेरिकेचं आण्विक तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी भारत सरकार त्यांच्या कायद्यांमध्ये बदल करणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तर भारताला F35 फायटर जेट पुरवण्याचा करार यावेळी अंतिम करण्यात आल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com