Shivaji Maharaj Statue
Shivaji Maharaj Statue

Shivaji Maharaj Statue: Video दीपक केसरकरांनी तोडले अकलेचे तारे; पुतळा कोसळला...ही एक संधी

Shivaji Maharaj Statue Collapsed at Rajkot Fort Malvan: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे नौदलाने घाईघाईने काम केले, अशी कबुली केसरकरांनी केली. पुतळा बनवताना काही तांत्रिक त्रुटी दूर केल्या नसल्यामुळे हा अपघात झाला असावा, ही एक संधी आहे.
Published on

मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत असतानाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.

केसरकरांनी आज घटनास्थळी भेट दिली. शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला हा अपघात आहे, असे वादग्रस्त विधान केसरकरांनी केल्याने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे नौदलाने घाईघाईने काम केले, अशी कबुली केसरकरांनी केली.

"पुतळा बनवताना काही तांत्रिक त्रुटी दूर केल्या नसल्यामुळे हा अपघात झाला असावा, ही एक संधी आहे. अरबी समुद्रात शिवाजी महाराज यांचा ज्या प्रमाणे पुतळा उभारण्यात येणार आहे. तसाच पुतळा येथे उभारला तर देशासाठी चांगली बाब ठरेल. काही तरी चांगले करण्याची ही संधी आहे," असे केसरकर म्हणाले.

काल (सोमवारी) सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण झाले होते.

पुतळ्याचे काम अवघ्या 8 महिने 22 दिवसांत पूर्ण झाले. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या ठिकाणी 45 किलोमीटर प्रति वेगानं वारे वाहत होते, त्यामुळं पुतळ्याचं नुकसान झाले," मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Shivaji Maharaj Statue
Yashwant Sinha: भाजपने नाकारलेला माजी मंत्री काढणार वाजपेयी यांच्या नावाने पक्ष

संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात हवा जोरातच असते. पण तरीही अनेक पुतळे हे समुद्रात, जमिनीवर जसेच्या तसे आहेत. सरकार म्हणत आहे समुद्रावर जोरात वारा होता, किल्ल्यावर वारा असणारच, हे कोणाला मूर्ख बनवत आहेत. त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. त्यामुळे ते जमिनीपासून वर उडत आहेत."

या प्रकरणी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरोधात मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला. यामध्ये पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. संरचनेत वापरलेले नट आणि बोल्ट गंजलेले आढळले आहेत, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com