Rahul Gandhi on Arvind Kejriwal : भाजपनंतर आता राहुल गांधींचाही 'शीश महल'वरून केजरीवालांना टोला, म्हणाले...

Arvind Kejriwal to Rahul Gandhi : राहुल गांधींच्या टीकेला केजरीवलांनाही दिलं आहे प्रत्यत्तुर ; जाणून घ्या, कोण काय म्हणालं?
Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Rahul Gandhi, Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi and Delhi Vidhan Sabha Election 2025 : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील वेस्ट नगरमध्ये एका रॅलीला संबोधित करत, भाजप आणि आम आदमी पार्टीवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, केजरीवाल मनात येईल ते बोलतात. तुम्हाला आठवतं केजरीवाल पोलवर चढून म्हणाले होते की ते वेगळ्या पद्धतीचे राजकारण करतील. त्यांचं घर तुम्ही बघितलं घर नाही शीश महल आहे. स्वच्छ राजकारणाबाबत बोलून आले होते आणि सर्वात मोठा मद्य घोटाळा दिल्लीत झाला.

राहुल गांधी(Rahul Gandhi) म्हणाले, केजरीवाल जेव्हा राजकारणात आले होते. तेव्हा त्यांच्याकडे एक छोटी कार होती आणि त्यांनी म्हटले होते की ते एक वेगळ्या प्रकारचे राजकारण करतील. त्यांनी म्हटले होते की ते दिल्लीला बदलतील. परंतु जेव्हा गरिबांना गरज होती तेव्हा ते तिथे नव्हते. जेव्हा दंगली झाल्या तेव्हा ते तिथे नव्हते. अन् त्यांनी म्हटले होते की ते स्वच्छ राजकारण करतील. केजरीवाल एक महल 'शीश महल'मध्ये राहतात, हे त्यांचं वास्तव आहे.

Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Rajendra Mulak News : निलंबित माजीमंत्री मुळक काँग्रेसच्या बैठकीत; मग विधानसभेला बंडखोरी कुणाच्या सांगण्यावरून झाली होती?

राहुल गांधींच्या या टीकेवर बोलताना, अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी ''लोक विचारत आहेत, राहुल गांधी “राजमहल”वर गप्प का आहेत? आज राहुल गांधींनी दिल्लीत पूर्ण भाजपवाल्याचं भाषण परत दिलं. जनतेला सांगा की भाजप आणि काँग्रेसमध्ये काय करार झाला आहे?'' अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

तर राहुल गांधींशिवाय भाजपनेही याआधी अरविंद केजरीवाल यांच्यावर कथित मद्य घोटाळा आणि मुख्यमंत्री निवासस्थानस शीश महल संबोधून सातत्याने टीका केलेली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या मुद्य्यावरून केजरीवालांवर निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी राजकीय पक्षांकडून मतदारांवर मोफत योजनांचा पाऊस, मात्र...

याचबरोबर राहुल गांधी यांनी भाजपवरही(BJP) टीका केली आणि म्हटले की, आरएसएस-भाजप भावाभावात भांडणं लावत आहेत. त्यांनी जीएसटी लागू केला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे कोणाचा फायदा झाला? त्यांनी दावा केला की यामुळे करोडपतींचा फायदा झाला, त्यांचे धोरण करोडपतींसाठीच आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com