Rajendra Mulak News : निलंबित माजीमंत्री मुळक काँग्रेसच्या बैठकीत; मग विधानसभेला बंडखोरी कुणाच्या सांगण्यावरून झाली होती?

Rajendra Mulak in Congress Meeting : निलंबन मागे घेण्याची अद्याप कुठलीच घोषणा झाली नसताना ते बैठकीत सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Rajendra Mulak1
Rajendra Mulak1Sarkarnama
Published on
Updated on

Vidharbha Congress News : विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे माजी राज्यमंत्री तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या. त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले होते. मात्र निलंबन मागे घेण्याची अद्याप कुठलीच घोषणा झाली नसताना ते बैठकीत सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून बंडखोरी पक्षाच्या सांगण्यावरून झाली होती का? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

काँग्रेसने(Congress) विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडी करून लढवली होती. रामटेक विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तर हिंगणा व काटोल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षासाठी सोडण्यात आला होता. ठाकरे गटाने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली होती.

Rajendra Mulak1
Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी राजकीय पक्षांकडून मतदारांवर मोफत योजनांचा पाऊस, मात्र...

असे असताना काँग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली होती. एवढच नाहीतर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदारांनी(Sunil Kedar) उघडपणे मुळक यांच्यासाठी प्रचार केला होता. काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे हे उमेदवारी दाखल करताना मुळक यांच्यासोबत होते. यावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनीसुद्धा याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले होते. ठाकरे गटाचे विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी केदारांनी पाठीत खंजीर खुपसला असा थेट आरोप केला होता. आरोपानंतर काँग्रेसने मुळकांच्या निलंबनाचे आदेश काढला. तर यामुळे नाराज झालेले उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत नागपूरमध्ये प्रचाराला आले नव्हते. दुसरीकडे उघडपणे बंडखोराच्या पाठिशी उभे राहणाऱ्या केदारांनी आपण उद्धव ठाकरे यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुळक यांचा प्रचार करीत असल्याचा दावा केला होता.

Rajendra Mulak1
BJP - Congress Donation News : लोकसभेआधी भाजपला मिळाली तब्बल 3 हजारांहून अधिक कोटींची देणगी, तर काँग्रेसला...

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांचा पराभव करून आपण उद्धव ठाकरे यांच्या अपमानाचा बदला घेणार असल्याचे ते म्हणाले. मात्र मुळकांची बॅट फार तळपली नाही. त्यांच्यासह ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला. महायुतीसोबत असलेल्या शिवसेनेचे आशिष जयस्वाल निवडून आले. त्यामुळे राजेंद्र मुळक यांचे राजकीय भवितव्य पणाले लागले आहे. काँग्रेसने त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून बाबा आष्टणकर यांच्याकडे नेतृत्व सोपवले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com