
Rahul Gandhi on News Tax Slab News : राहुल गांधींनी म्हटले आहे की, असं कानावर येत आहे की GSTद्वारे सातत्याने वाढत्या वसुलीदरम्यान आता सरकार एक नवीन टॅक्स स्लॅब सादर करण्याच्या तयारीत आहे आणि तुमच्या गरजेच्या वस्तूंवर GST वाढवण्याची योजना आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की, गर्भश्रीमंताना सूट आणि सर्वसामान्यांच्या लुटीचं आणखी एक उदाहरण बघा. एकीकडे कॉर्पोरेट टॅक्सच्या तुलनेत इनकम टॅक्स सातत्याने वाढत आहे, तर दुसरीकडे मोदी सरकार गब्बर सिंह टॅक्स(GST) मधून आखणी जास्त वसुलीची तयारी करत आहे.
राहुल गांधींनी(Rahul Gandhi) म्हटलं की, असं ऐकायला येत आहे की, GSTमधून सातत्याने वसुलीच्या दरम्यान सरकार एक नवी टॅक्स स्लॅब सादर करणार आहे. तुमच्या गरजेच्या वस्तूंवरील GST वाढवण्याची योजना आहे. तसेच त्यांनी म्हटले की, जरा विचार करा, आता सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. लोक कधीपासून पै अन् पै जोडून जमवत आहेत आणि या दरम्यान सरकार १५०० रुपयांपेक्षा जास्तच्या कपड्यांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून वाढवून १८ टक्के करण्याच्या तयारी आहे.
राहुल गांधींनी असंही म्हटले की, हा घोर अन्याय आहे. अब्जाधिशांना करात सूट द्यायची आणि त्यांची मोठमोठाली कर्ज माफ करण्यासाठी गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबाच्या कष्टाच्या कमाईला कराद्वारे लुटले जात आहे. आमची लढाई याच अन्यायाविरोधात आहे. सर्वसामान्यांना बसत असलेल्या कराच्या फटक्याविरोधात आम्ही मजबुतीने आवाज उठवू आणि ही लूट थांबवण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करू.
जीएसटीबाबत मंत्र्यांच्या समूहाने सिगारेट, तंबाखू आणि संबंधित उत्पादनांवरील टॅक्सचा दर २८ टक्क्यांवरून वाढवून ३५ टक्के करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. या प्रस्तावानंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे. तंबाखू, तंबाखू उत्पादनं आणि पेयांवर ३५ टक्के जीएसटी दर लागू करण्याचा सल्ला प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्यास प्रोत्साहन देणे आणि शासकीय महसूल वाढवण्याच्या उद्देशाने देण्यात आला आहे. तसं तर ३५ टक्के कर जीएसटीच्या उच्च ब्रॅकेटमध्ये येतो.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.