राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल; दोन उद्योगपतींशिवाय पंतप्रधान बनू शकत नाहीत

काँग्रेसचे (Congress) दिल्लीत केंद्र सरकार विरोधात आंदोलन
Rahul Gandhi
Rahul Gandhisarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi : नवी दिल्ली : वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरचा जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस (Congress) चांगलीच आक्रमक झाली आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्त्वात आज रामलीला मैदानावर मोदी सरकारविरोधात हल्लाबोल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली होती. त्या चौकशीवरुनही त्यांनी नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आव्हान दिले आहे. काँग्रेसने गेल्या ७० वर्षात देशाला इतकी महागाई कधीच दिली नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. देशाला रोजगार देणाऱ्यांचा भाजपने (BJP) कणा मोडला, असा आरोप त्यांनी केला.

Rahul Gandhi
Supriya Sule : टीव्ही बघते तेव्हा मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात !

तसेच केवळ दोन उद्योपतींनाच मोठे करण्यात येत आहे. मीडियादेखील सत्य दाखवत नाही, कारण मीडियाही त्या दोन उद्योगपतींच्या हातात, असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मीडियाच्या आणि त्या दोन उद्योगपतींच्या समर्थनाशिवाय मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

Rahul Gandhi
Shiv Sena : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक दणका ; राज्यपालांकडून ठाकरेंच्या यादीला केराची टोपली

मला ५५ तास ईडीच्या कार्यालयात बसवले. मात्र, मी मोदींना सांगू इच्छितो मी तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही मला ५०० तास जरी ईडीच्या कार्यालयात बसवले तरी काही फरक पडत नाही. हा देश संविधानावर चालतो. जर आपण याविरोधात उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com