Election Commission News : राहुल गांधी लोकसभेत बोलले अन् दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल!

Voters List Rahul Gandhi news Maharashtra Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी बोगस मतदारांचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे.
Election Commission, Rahul Gandhi
Election Commission, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत महाराष्ट्रासह हरियाणा आणि राज्यांतील मतदार याद्यांमधील कथित घोळाचा मुद्दा उपस्थित केला होता. इतर काही सदस्यांनीही घोळावरून निवडणूक आयोगाला धारेवर धरले होते. या घोळावर लोकसभेत चर्चा करण्याची मागणी राहुल यांनी केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी बोगस मतदारांचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. यापूर्वीही त्यांनी संसदेत हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर नुकताच दिल्लीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनीही यावरून आयोगाल लक्ष्य केले होते. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकच मतदान ओळखपत्र क्रमांक असलेले मतदार उघडकीस आल्याचा दावा केला होता.

Election Commission, Rahul Gandhi
Parliament Session : राज्यसभेत ठोकण्याची भाषा; नड्डांचा आक्रमक पवित्रा, खर्गेंनी मागितली माफी...

राहुल यांनी त्यानंतर लोकसभेत यावरच प्रामुख्याने चर्चा करावी, अशी विनंती अध्यक्षांकडे केली होती. त्यानंतर मंगळवारी निवडणूक आयोगाने सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांना पत्र पाठवून सुचना, हरकती मागवल्या आहेत. जे मुद्द्यांवर निर्णय़ झालेला नाही किंवा वाद आहे, त्याची माहिती 30 एप्रिलपर्यंत पाठवण्याचे आवाहन आयोगाकडून राजकीय पक्षांना करण्यात आले आहे.

आयोगाकडून राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रमुख नेत्यांशीही चर्चा केली जाणार आहे. मतदान प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी ही चर्चा करणार असल्याचे आयोगाकडून प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. मागील आठवड्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सर्व राज्यांतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत राजकीय पक्षांशी सातत्याने संवाद ठेवून त्यांच्याकडून प्राप्त सुचना 31 मार्चपर्यंत पाठवण्याचे सांगण्यात आले होते.

Election Commission, Rahul Gandhi
Amit Shah News : घुसखोरीवर अमित शहांकडून मोठा घाव; आता एकच कायदा, चार जुने कायदे रद्द होणार...

राजकीय पक्ष हे मतदानाच्या प्रक्रियेतील महत्वाचा घटक आहेत, असेही आयोगाकडून म्हटले आहे. आता आयोगाकडून एक पाऊल पुढे टाकत सर्वच राजकीय पक्षांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. त्यामुळे कथित बोगस मतदार याद्यांच्या घोळाबाबत या पक्षांकडून आयोगावर सुचनांचा भडिमार केला जाण्याची शक्यता आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com