Rahul Gandhi addressing media, alleging vote theft inside the Election Commission.
Rahul Gandhi addressing media, alleging vote theft inside the Election Commission.Sarkarnama

Rahul Gandhi News : निवडणूक आयोगातील गुपितं समोर येणार? राहुल गांधींनी केला मोठा गौप्यस्फोट

Rahul Gandhi’s Explosive Claim on Election Commission : राहुल गांधी यांनी यापूर्वी आपण हायड्रोन बॉम्ब टाकणार असल्याचे सांगितले होते. पण आजची पत्रकार परिषद हा बॉम्ब नाही, पुढे असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाला धडकी भरवली आहे.
Published on

थोडक्यात महत्वाचे :

  1. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मतचोरीचे आरोप केले, विशेषतः कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो मतदारांची नावे वगळल्याचे उघड केले.

  2. निवडणूक आयोगातूनच आता माहिती मिळत असल्याचा दावा राहुल गांधींनी केला, ज्यामुळे आयोगातील कथित गुपितं बाहेर येणार का यावर चर्चा सुरू झाली आहे.

  3. मतदारांची नावे सॉफ्टवेअर व कॉल सेंटरद्वारे डिलीट होत असल्याचे राहुल गांधींचा आरोप, तर कर्नाटकमधील काही प्रकरणांत मोबाईल नंबर वापरून नावे वगळल्याचे पुरावे सादर झाले.

Rahul Gandhi Election Commission : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत घेत पुन्हा एकदा ‘मतचोरी’चे आरोप केले. यावेळी त्यांनी कर्नाटकातील आळंद आणि महाराष्ट्रातील राजुरामधील प्रत्येकी सुमार सहा हजार मतदारांची नावे कशाप्रकारे वगळली, याची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी आयोगाशी संबंधित एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एक महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, निवडणूक आयोगातूनच आता आम्हाला माहिती मिळण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी ही माहिती मिळत नव्हती. आता हे थांबणार नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगातील कर्मचारी किंवा अधिकारीच राहुल गांधींना माहिती पुरवत असल्याचे उघड झाले आहे.

काँग्रेसने राहुल गांधींच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, ‘निवडणूक आयोगात आमची माणसे आहेत. आता निवडणूक आयोगातूनच आम्हाला मतचोरीची माहिती मिळू लागली आहे.’ राहुल यांच्या या दाव्यामुळे आता निवडणूक आयोगातील कथित गुपितं बाहेर येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Rahul Gandhi addressing media, alleging vote theft inside the Election Commission.
Rahul Gandhi Hydrogen Bomb : राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बाॅम्ब'आधीच काँग्रेसचा व्हिडिओ, भाजपचे टेन्शन वाढले!

दरम्यान, राहुल यांनी यापूर्वी आपण हायड्रोन बॉम्ब टाकणार असल्याचे सांगितले होते. पण आजची पत्रकार परिषद हा बॉम्ब नाही, पुढे असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाला धडकी भरवली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मतदारयादीतून नावे कशी वगळली जातात, याची माहिती दिली. सॉफ्टवेअर आणि कॉल सेंटरच्या माध्यमातून नावे वगळली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटकातील मतचोरीचे प्रकरण एका बीएलओच्या मार्फत पकडण्यात आले आहे. त्यांच्या नातेवाईकाचेच नाव वगळण्यात आले होते. बीएलओने याची माहिती घेतली तेव्हा समोर आले की, नातेवाईकाचे मत त्याच्याच शेजाऱ्याने डिलीट केले. त्यांनी शेजाऱ्याकडे विचारणा केल्यानंतर आपण हे केले नसल्याचे त्याने सांगितले. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर समोर आले की, कोणीतरी तिसऱ्यानेच सेंट्रलाईज माध्यमातून हे काम केले होते.

Rahul Gandhi addressing media, alleging vote theft inside the Election Commission.
Rahul Gandhi Hydrogen Bomb : 'त्या' नंबरवर ओटीपी आला अन्... , राहुल गांधींचा मोठा खुलासा, हा हायड्रोजन बाॅम्ब नाही!

काही व्यक्तींच्या मोबाईलचा वापर करून मतदारांची नावे वगळली जात आहेत. मात्र, याबाबत संबंधितांना काही माहिती नसल्याचे राहुल यांनी सांगितले. कर्नाटकातील सूर्यकांत नावाच्या व्यक्तीलाही त्यांनी पत्रकार परिषदेत आणले. त्यांनी स्वत:च आपल्या नावाचा आणि मोबाईल नंबरचा वापर करून 12 जणांची नावे वगळण्यात आल्याचे यावेळी सांगितले. नाव वगळण्यात आलेली महिला मतदारही यावेळी उपस्थित होती.  

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: राहुल गांधींनी कोणते नवीन आरोप केले?
A: त्यांनी कर्नाटक व महाराष्ट्रात हजारो मतदारांची नावे बेकायदेशीररीत्या वगळली गेल्याचा आरोप केला.

Q2: ही माहिती त्यांना कुठून मिळाली?
A: राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, निवडणूक आयोगातील अधिकारी/कर्मचारीच माहिती पुरवत आहेत.

Q3: नावे कशी डिलीट केली गेली?
A: सॉफ्टवेअर, कॉल सेंटर आणि मोबाईल नंबरचा गैरवापर करून नावे वगळली गेल्याचे आरोप आहेत.

Q4: या प्रकरणात कोणते उदाहरण समोर आले?
A: कर्नाटकमधील सूर्यकांत नावाच्या व्यक्तीच्या मोबाईलवरून १२ मतदारांची नावे डिलीट झाल्याचा खुलासा झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com