Vote Chori: राहुल गांधींना निवडणूक आयोगातच सापडला बिभीषण! मतचोरीच्या आरोपांसाठी दारुगोळा पुरवणारा तो व्यक्ती कोण? शोधाशोध सुरु

Vote Chori: गेल्यावेळी राहुल गांधी यांनी मतदारांची नाव कशी घुसवली गेली हे सांगितलं होतं आज त्यांनी याद्यांमधून नावं कशी डिलीट केली गेली हे सांगितलं.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Vote Chori: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोगाला पुन्हा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. गेल्यावेळी त्यांनी एकाच पत्त्यावर एकाच नावाचे अनेक फेक मतदार याद्यांमध्ये कसे वाढवले गेले हे सांगितलं होतं. आज त्यांनी दलित, आदिवासी, मुस्लिम मतदारांची नाव याद्यांमधून कशी डिलीट केली गेली हे सांगितलं. आपल्याला ही सर्व माहिती निवडणूक आयोगातीलच काही लोकांनी दिली असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळं आयोगातला हा बिभिषण कोण? त्याचा आता शोध घेतला जात आहे.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी म्हणाले, "मला तुम्हाला सांगायचं आहे की, निवडणूक आयोगामधूनच आता आम्हाला मदत मिळायला सुरुवात झाली आहे. मी स्पष्टपणे सांगतो आहे, निवडणूक आयोगातूनच मदत मिळतेय, हे आधी होत नव्हतं. आता हे थांबणार नाही, हे थांबू शकत नाही. भारताची जनता ही गोष्ट स्विकारणार नाही. एकदा का भारताच्या जनतेला किंवा तरुणांना याची खात्री पटली की आपलं मत चोरी केलं जातंय तर त्यांची शक्ती याविरोधात कामाला लागेल"

Rahul Gandhi
Old Vehicles : जुनं वाहन खरेदी किंवा विक्री करताय तर थांबा! पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले 'हे' आदेश वाचा

निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगानं प्रत्युत्तर दिलं आहे. सोशल मीडियातून उत्तर देताना निवडणूक आयोगानं म्हटलंय की, कोणतीही सामान्य व्यक्ती ऑनलाइन पद्धतीनं नाव हटवू शकत नाही. उलट नाव हटवण्यापूर्वी संबंधित आयोगाकडून त्या मतदाराला म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. सन 2023 मध्ये आळंदमध्ये नावं हटवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्यावेळी आम्ही एफआयआरही दाखल केला. त्यामुळं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोप हे निराधार आणि अयोग्य आहेत, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

Rahul Gandhi
Pune Gun Fire: कोथरुडमध्ये गुंडांचा हैदोस! तीन गोळ्यांनी जखमी झालेल्या प्रकाश धुमाळ यांनी सांगितली आपबिती

निवडणूक आयोगात खळबळ

राहुल गांधींनी आरोप करताना आम्हाला निवडणूक आयोगातूनच माहिती मिळत असल्याचा आरोप केल्यानं आता आयोगात खळबळ उडाली आहे. आपल्यातली ही व्यक्ती नेमकी कोण? याची चाचपणी केली जात असल्याचं सुत्रांच्या हवाल्यानं कळतं आहे. जर राहुल गांधींनी आयोगातल्या माणसाबाबत केलेला दावा खरा असेल तर नेमकं खरं कोण आणि खोटं कोण? अशा स्वरुपाचे प्रश्न आता लोक सोशल मीडिच्या माध्यमातून विचारायला लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com