Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! लखनऊ कोर्टाने 'या' प्रकरणात बजावले समन्स

Lucknow court summons Rahul Gandhi : आता 'या' तारखेपर्यंत राहुल गांधींना कोर्टासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Lucknow Court Summons Rahul Gandhi: उत्तर प्रदेशमधील लखनऊच्या एका कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावल आहे. त्यामुळे आता राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं दिसत आहेत. राहुल गांधींवर आरोप आहे की, त्यांनी मागील वर्षी महाराष्ट्रात भारत जोडो रॅली दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात कथितरित्या अपमानास्पद टिप्पणी केली होती. ज्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती.

मुख्य न्यायदंडाधिकारी अलोक वर्मा यांनी म्हटले की, राहुल गांधींची भाषणं आणि पत्रकं, ज्यामध्ये सावरकारांवर पेन्शन घेणारे ब्रिटिश नोकर असल्याचा आरोप करण्यात आला होता. समाजात द्वेष आणि दुर्भावना पसरवतात.

न्यायालयास पुढे आढळले की, राहुल गांधी(Rahul Gandhi) विरोधात प्राथमिकदृष्ट्या खटला तयार होतो आणि यासाठी त्यांना समन्स जारी करून 10 जानेवरी 2025 रोजी कोर्टासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले गेले.

Rahul Gandhi
PM Modi News : संविधान निर्मितीत अन् सशक्तिकरणात नारीशक्तीची मोठी भूमिका - पंतप्रधान मोदी

राहुल गांधींवर भारतीय दंड संहिता(आयपीसी)च्याकलम 153ए (शत्रुत्वास प्रोत्साहन देणे) आणि 505 (सार्वजनिक खोडसाळपणा) अंतर्गत आरोप लावले गेले आहेत. वकील नृपेंद्र पांडे यांच्याद्वारे दाखल याचिकेवर कोर्ट सुनावणी करत होते. पांडे यांनी एका अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता, सावरकारांवर टिप्पणीसाठी गांधीविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी अर्ज केला होता.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : संविधान अन् मनुस्मृतीची प्रत दाखवत राहुल गांधींची भाजपवर टीका; म्हणाले, ' सरकारने युवकांचे अंगठे कापले...'

पांडे यांनी मागील वर्षी 17 नोव्हेंबर रोजी राहुल गांधींद्वारे कथितरित्या केल्या गेलेल्या टिप्पणीवर तक्रार केली होती. ज्यामध्ये राहुल गांधींनी सावरकारांना इंग्रजांचे सहकारी म्हटले होते आणि पुढे म्हटले होते की, सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळत होती. पांडे म्हणाले होते की, या टिप्पणी समाजात द्वेष पसरवण्याच्या हेतूने केले गेले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com