Rahul Gandhi News : राहुल गांधी अमेठीतून लढणार? स्वागताची जोरदार तयारी सुरू

Lok Sabha Election 2024 : अमेठीतून राहुल गांधी व रायबरेलीतून प्रियंका गांधी उमेदवार राहण्याची शक्यता आहे. राहुल गांधी वायनाडमधूनही निवडणूक लढत आहेत.
Rahul Gadhi
Rahul GadhiSarkarnama

Delhi Political News : अमेठी व रायबरेली या मतदारसंघात काँग्रेसचे कोण उमेदवार राहणार, हे अद्यापही पक्षाने जाहीर केलेले नाही. मात्र अमेठीतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या सजावटीला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे अमेठीतून पुन्हा काँग्रेस नेते राहुल गांधी उमेदवार राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रायबरेली व अमेठी या दोन्ही मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. गेल्या निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधी Rahul Gandhi यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पराभूत केले होते. आता रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण उमेदवार राहणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

अमेठीतून राहुल गांधी व रायबरेलीतून प्रियंका गांधी Priyanka Gandhi उमेदवार राहण्याची शक्यता आहे. राहुल गांधी वायनाडमधूनही निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघातील शुक्रवारी (ता. 26) मतदान संपले आहे. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी लढणार असल्याच्या चर्चेमुळे अमेठीतील काँग्रेस Congress कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, अमेठीचे कार्यकर्ते काही दिवसांपूर्वी दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयात ठाण मांडून बसले होते. काँग्रेसच्या सर्वेक्षणात या दोन्ही मतदारसंघात काँग्रेससाठी पोषक वातावरण असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे अमेठीतील काँग्रेस कार्यालय व राहुल गांधी यांच्या राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या घराची डागडुजी केली जात आहे.

Rahul Gadhi
Navneet Rana : मतदानादिवशीच नवनीत राणांना झटका, हनुमान चालिसा पठणप्रकरणी कोर्टाचा मोठा आदेश

या कामामुळे राहुल गांधी पुन्हा अमेठीतून Amethi निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या वाट्याला उत्तरप्रदेशातील 17 जागा आलेल्या आहेत. त्यापैकी 15 जागांवरील उमेदवारांची घोषणा काँग्रेसने केलेली आहे. केवळ याच दोन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. भाजपने सुद्धा रायबरेली या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा अद्याप केलेली नाही.

(Edited by Sunil Dhumal)

Rahul Gadhi
Eknath Shinde : मंडलिक, मानेंसाठी मुख्यमंत्री शिंदेंचे बेरजेचे गणित; कोल्हापुरात ठरणार रणनीती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com