Rahul Gandhi Setback : राहुल गांधींची खासदारकी धोक्यात? अमित शाहांनी रचला चक्रव्यूह; काय होऊ शकते कारवाई?

Rahul Gandhi Vs Amit Saha Privileges Committee : राहुल गांधी यांनी संसदेमध्ये सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकाच्या चर्चेवेळी अमित शाहांना उद्देशून काढलेल्या शब्दांमुळे त्यांची अडचण वाढली आहे.
Rahul Gandhi, Amit shah
Rahul Gandhi, Amit shahSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News: पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू दिले नाही. जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पॅलेटगनचा वापर करण्यात आला. त्या विरोधात विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक झाले होते.

सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकावरील चर्चेतील त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना उद्देशून 'इडियट' शब्दाचा वापर केला.

या विरोधात लोकसभा विशेषाधिकार समितीनी काँग्रेस नेते राहुल गांधींना नोटीस पाठवलीये. गृहमंत्र्यांविरोधात असंसदीय व अवमानकारक भाषा वापरल्याचा राहुल गांधी यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी 28 ऑगस्ट 2026 पर्यंत उत्तर आणि स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी 30 जुलै रोजी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती.

राहुल गांधींनी आपली बाजु समितीसमोर मांडल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. दरम्यान, राहुल गांधी जर दोषी आढळले तर त्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे. तसेच संसदेचा अपमान केल्याचे सिद्ध झाले तर थेट त्यांची खासदारकीही धोक्यात येऊ शकते.

Rahul Gandhi, Amit shah
Rahul Gandhi: अमित शहांवरील आरोप अन् 'इडियट' शब्दप्रयोग राहुल गांधी महागात पडणार? विशेषाधिकार समितीनं उचललं मोठं पाऊल

काय कारवाई होणार?

त्यांच्यावरील गैरवर्तनचा आरोप सिद्ध झाला तर त्यांना सभागृहाची माफी मागावी, असे आदेश दिले जातील. त्यांचे वक्तव्य अत्यंत गंभीर आहे, असे समितीचे मत बनले तर त्यांच्या निलंबनाची शिफारस देखील केली जाऊ शकते. तसेच त्यांना सक्त ताकीदही देण्यात येईल. अगदी दुर्मिळ प्रसंगात त्यांची खासदारकी रद्द केली जाऊ शकते. मात्र, राजकीय तज्ज्ञांच्या मते यांची शक्यता फारच कमी आहे.

Rahul Gandhi, Amit shah
Parliament debate : राहुल गांधींनी स्वत:लाच सापळ्यात अडकविले..! थेट अमित शहांना भिडल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचा पारा चढला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com