Rahul Gandhi News : भाजपनं पराचा कावळा केला! श्वानाच्या व्हायरल व्हिडिओवर राहुल गांधी भडकले

Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी एका श्वानाला बिस्कीट देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. यात्रेदरम्यान एका श्वानाने न खाल्लेले बिस्कीट कार्यकर्त्याला खायला दिल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यावरून आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही निशाणा साधला होता. (Rahul Gandhi News)

राहुल गांधी यांनी भाजपचा दावा फेटाळून लावला आहे. याबाबत खुलासा करताना ते म्हणाले, 'यात्रेदरम्यान श्वानाला घेऊन त्याच्या मालकाला बोलावले होते. मी श्नानाला बिस्कीट देण्याचा प्रयत्न केला, पण ते ते घाबरल्याचे दिसले. त्यामुळे ते बिस्कीट मालकाला दिले. त्याच्या हातून श्वानाने बिस्कीट खाल्ले. मला समजले नाही, यामध्ये वादाचा मुद्दा काय आहे,' असा संताप त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधींच्या या खुलाशामुळे भाजपचे (BJP) नेत्यांकडून करण्यात आलेला दावा फोल ठरला आहे.

Rahul Gandhi
UCC Bill : लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी, बहुविवाहाला बंदी..! देशात इतिहास घडणार...

भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) झारखंडमध्ये असतानाचा दोन दिवसांपुर्वीचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ काँग्रेसकडूनच (Congress) सोशल मीडियात पोस्ट करण्यात आला होता. याच घटनेचा एक व्हिडिओ भाजपच्या आयटी सेलचे अमित मालवीय यांनीही पोस्ट केला. त्यावर मालवीय यांनी म्हटले होते की, ‘श्वानाने न खाल्लेले बिस्कीट राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला दिले.’ व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका व्यक्तीला बिस्कीट देताना दिसत आहेत. एवढाच व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे मागील काही दिवसांपासून राहुल गांधींना सतत लक्ष्य करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनीही लगेच ट्विट केले. राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंब मला बिस्कीट भरवू शकले नाहीत. मी स्वाभिमानी आसामी आणि भारतीय आहे. मी ते खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसचा राजीनामा दिला, असे सरमा यांनी म्हटले होते.

Rahul Gandhi
Rajya Sabha Election 2024 : कुमार विश्वास यांना राज्यसभेची उमेदवारी? भाजप देणार धक्का...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com