Chief Election Commissioner : मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड वादात? काँग्रेसची कोर्टात धाव

Gyanesh Kumar CEC appointment controversy: सुप्रिम कोर्टात 19 फेब्रुवारी 2025 रोजी याबाबतची सुनावणी आहे. मोदी सरकारने आपल्या अधिकारात मध्यरात्री मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची अधिसूचना काढली आहे.
Gyanesh Kumar CEC appointment controversy
Gyanesh Kumar CEC appointment controversySarkarnama
Published on
Updated on

CEC Gyanesh Kumar: देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती आता वादात सापडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी त्याला विरोध केला आहे.

निवडणूक आयुक्त निवड प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे, या याचिकेवर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला स्थगिती द्या, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. या नियुक्तीच्या विरोधात काँग्रेस कोर्टात जाणार आहे.

नवीन कायद्यानुसार निवडणूक आयुक्त नेमताना आता मुख्य न्यायाधीश नसतात, यापूर्वी या निवड प्रक्रियेत देशाच्या मुख्य न्यायाधीशाचा समावेश होता. पण गेल्या वर्षी केंद्र सरकारने याबाबतच्या कायद्यात बदल केला. काँग्रेस आणि अन्य पक्षांनी त्याला विरोध करीत सुप्रिम कोर्टात धाव घेतली. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, याचा निकालाबाबत आम्हाला प्रतिक्षा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारने घेतलला हा निर्णय राज्य घटनेच्या विरोधात आहे, असे राहुल गांधी म्हणाले. सुप्रिम कोर्टात 19 फेब्रुवारी 2025 रोजी याबाबतची सुनावणी आहे. मोदी सरकारने आपल्या अधिकारात घाईत सोमवारी मध्यरात्री मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची अधिसूचना काढली आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त हा निष्पक्ष असावा, असे मत अनेक प्रकरणात सुप्रिम कोर्टानं नोंदवले आहे, असे काँग्रेसचे महासचिव वेणुगोपाल यांनी सांगितले.

Gyanesh Kumar CEC appointment controversy
Maharashtra Politics: शरद पवारांच्या नेत्याची पुन्हा घरवापसी? नितीन गडकरींची घेतली भेट

सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून ज्ञानेश कुमार हे उद्या ( 19 फेब्रुवारी)पदभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजूरी दिल्यानंतर विधी व न्याय मंत्रालयाकडून याबाबतचा शासन निर्णय सोमवारी (ता.17) रात्री काढण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे, असे अधिसूचनेत म्हटलं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या जागी आता डॉ. विवेक जोशी निवडणूक आयुक्त असतील. ज्ञानेश कुमार 1988 बॅच केरळ केडरचे IAS अधिकारी आहेत. मागच्यावर्षी मार्च पासून ते निवडणूक आयुक्त या पदावर कार्यरत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com