Rahul Gandhi prediction : मोदी सरकार वर्षभरातच कोसळणार! राहुल गांधी यांची भविष्यवाणी, कारणही सांगितले...

Modi government collapse claim, BJP reaction news : राहुल गांधी यांचे विधान सहज घेण्यासारखे नाही, देशात अराजकता पसरविण्याचे गंभीर षडयंत्र असल्याचा आरोपही पीयूष गोयल यांनी केला.
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Congress vs BJP political controversy : कॉक्रोच जनता पार्टीने सोशल मीडियात धुमाकूळ घातल्यानंतर केंद्र सरकारविरोधातही आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पार्टीने मोहीम हाती घेतली आहे. सरकारसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे विरोधी पक्षासह विविध संघटनांनी म्हटले आहे. त्यातच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारबाबत धक्कायदक विधान केले आहे.

काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल यांनी सरकार वर्षभरात कोसळेल, अशी भविष्यवाणी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक स्थिती आणि देशात वाढणारा आर्थिक असंतोष हे त्यासाठी कारणीभूत ठरतील. सध्या लोकांची नाराजी वाढत चालली असून त्याचा परिणाम भारताच्या राजकारणावरही दिसून येईल, असे राहुल यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती काँग्रेसमधील सुत्रांनी दिली.

राहुल गांधी यांच्या हे विधान समोर आल्यानंतर भाजप नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी देशात अराजकता निर्माण करण्याचे हे गंभीर षडयंत्र असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, राहुल गांधी यांचे विधान म्हणजे देशाविरोधात काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष आणि भारताला अस्थिर करण्याची स्वप्न पाहणाऱ्या टूलकिट गँगच्या मोठा षडयंत्राकडे इशारा करत आहे.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Cockroach Janata Party news : अभिजीत दीपके यांनी PM मोदींच्या विश्वासू मंत्र्यांना घेतलं शिंगावर, पुराव्यानिशी दिलं प्रत्युत्तर; क्रॉक्रोच जनता पार्टीला भारतातूनच 'सपोर्ट'

राहुल यांचे विधान सहज घेण्यासारखे नाही, देशात अराजकता पसरविण्याचे गंभीर षडयंत्र असल्याचा आरोपही पीयूष गोयल यांनी केला. राहुल गांधी आणि कंपनीने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेच्या हृदयातून हटवू शकत नाही, असे पाहिल्यानंतर ते देशात हिंसा पसरवू इच्छितात. देशाचे भले ते पाहू शकत नाहीत. देशात बदनाम करणे, संविधानिक संस्थाचा अपमान करणे, परदेशात जाऊन भारतातील अंतर्गत मुद्दयांवर हस्तक्षेप करण्याचे आवाहन करणे, हे काँग्रेसचा खरा चेहरा दाखवत असल्याची टीका गोयल यांनी केली आहे.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Falta election result : भाजपची विक्रमी विजयाच्या दिशेने आगेकूच; TMC जवळपासही नाही, बालेकिल्ला नेस्तनाबूत

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संबीत पात्रा म्हणाले, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी पहिल्यांदाच असा दावा केलेला नाही. २०१९ मध्येही त्यांनी पंतफ्रधान मोदींविरोधात लोक रस्त्यावर उतरतील, असे म्हटले होते. आज संपूर्ण जग युध्दामुळे संकटात आहे. तरीही भारत खंबीरपणे उभा आहे. राहुल गांधी हे देशात अशांतता पसरविणे आणि दंगली भडविण्याचे षडयंत्र रचत असल्याचे त्यांच्या विधानावरून दिसते, असे आरोप पात्रा यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com