West Bengal political news : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा २९३ जागांचा निकाल ४ मे रोजी जाहीर झाला आहे. एका मतदारसंघात मतदानप्रक्रियेत गडबड झाल्याने भारतीय निवडणूक आयोगाने फेरमतदान घेतले. त्याची मतमोजणी रविवारी सकाळी सुरू झाली असून आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपच्या उमेदवाराने विक्रमी विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे. प्रमुख विरोधक असलेल्या तृणणूल काँग्रेसचा उमेदवार भाजपच्या जवळपासही नसून थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहे. त्यापैकी भाजपने २०७ जागा जिंकत राज्यात पहिल्यांदाच सत्ता काबीज केली आहे. फालटा विधानसभा मतदारसंघही भाजप आपल्या नावावर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात मागील आठवड्यात मतदान झाले आहे. आज सुरू असलेल्या मतमोजणीनुसार, आतापर्यंत ११ व्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार देवांशू पांडा यांनी तब्बल ७२ हजार ८२ मते मिळवत विरोधकांवर मोठी आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या क्रमांकावरील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभू कुर्मी असून त्यांना सुमारे २७ मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आणि चौथ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान आहेत. त्यांना केवळ ३ हजार ८७० मते मिळाली आहे. अद्याप मतमोजमीच्या दहा फेऱ्या बाकी आहेत. सध्याचे चित्र पाहता पांडा हे विक्रमी विजय मिळवतील, असे दिसते. या विजयानंतर भाजपचा आमदारांचा आकडा २०८ वर पोहचेल.
जहांगीर खान यांनी मतदानाच्या दोन दिवस आधीच निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. प्रचारादरम्यानही त्यांच्यासह तृणमूलच्या कोणत्याही बड्या नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. खान यांच्यावर ४ मेनंतर अनेक गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी कोर्टाने त्यांना २७ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते. या निकालानंतरच काही तासांतच खान यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले होते.
खान यांच्या माघारीमुळे निवडणूक एकतर्फी होणार हे स्पष्ट होते. त्यानुसार पांडा यांना अपेक्षेनुसार मते मिळाली असल्याचे मानले जात आहे. फालटा हा तृणमूल काँग्रेसचा २०११ पासूनच गड आहे. खान हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात होते. दुसऱ्या टप्प्यातील प्रचारादरम्यान एक आयपीएस अधिकारी आणि त्यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला होता. त्यातच आयोगाने फेरमतदानाची घोषणा केल्याने या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.