Rahul Gandhi on BJP : ''महाराष्ट्राच्या लोकांना विचारा, ते सांगतील भाजपने निवडणूक..'' ; राहुल गांधींनी साधला निशाणा!

Rahul Gandhi on PM Modi : आता कुठं गेली 56 इंचाची छाती? असा सवालही राहुल गांधींनी काँग्रेस अधिवेशनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.
Rahul Gandhi Vs PM Modi
Rahul Gandhi Vs PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Congress Ahmedabad convention News : गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचं ८४वं अधिवेशन होत असून, हे दोन दिवसीय अधिवेशन आहे. यामध्ये आज(बुधवार) काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलताना पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, ''बांगलादेशचे राष्ट्रपती उलट उत्तर देतात आणि नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत बसलेले आहेत. मात्र ते एकदम गप्प असतात, एक शब्दही तोंडून निघत नाही. कुठं गेली 56 इंचाची छाती? आपले पंतप्रधान हे थेट समोर झुकतात. हे भारताचं वास्तव आहे. देश आता वैतागला आहे.''

Rahul Gandhi Vs PM Modi
Rahul Gandhi : दलित, मुस्लिमांमध्ये गुंतून पडलो अन् ओबीसी सोडून गेले', राहुल गांधींनी व्यक्त केली खंत

याशिवाय ''तुम्ही बिहारच्या निवडणुकीत बघाल. महाराष्ट्राच्या लोकांना विचारा, ते सांगतील भाजपने महाराष्ट्रात निवडणूक कशी जिंकली, ते तुम्हाला सांगतील. कशाप्रकारे निवडणूक जिंकली आहे. निवडणूक आयोगाला आम्ही, मतदार यादी महाराष्ट्राची मतदार यादी. आम्ही विचारून विचारून थकलो. आजपर्यंत निवडणूक आयोग आम्हाला महाराष्ट्राची मतदार यादी देवू शकलेला नाही. हे वास्तव आहे, पण येणाऱ्या काळात येथे बदल येणार आहे. लोकांचा मूड दिसत आहे. ही विचारधारेची लढाई आहे.'' असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

याचबरोबर ''गांधीजींच्या आणि आरएसएसच्या विचारधारेत काय फरक आहे? सर्वप्रथम ही राज्यघटना आपली विचारधारा आहे. यामध्ये महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, भगवान गौतम बुद्ध, नारायण गुरू, गुरुनानक, संत कबीर, बसवण्णा यांची विचारधारा आहे. हे ७० वर्षे जुने डॉक्यूमेंट नाही. ही हजारो वर्षे जुनी विचाराधारा आहे आणि ही तुमची आहे. काँग्रेस पक्षाच्या रक्ताने घामाने ही राज्यघटना बनवली गेली आहे आणि आज यावर आक्रमण होत आहे. संस्थांवर आक्रमण होत आहे.'' असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi Vs PM Modi
Trade War : मोठी बातमी! अमेरिकेने लादला 104 टक्के टॅरिफ, चीनने मागितली भारताची मदत

याशिवाय, ''अग्नीवीर, अदाणी-अंबानीला देशातील संपूर्ण धन हे सर्व राज्यघटनेवर आक्रमण होत आहे. राज्यघटनेत कुठेच लिहिलेलं नाही की, भारताची संपूर्ण संपत्ती दोन-तीन लोकांच्या हातात असायला हवं. राज्यघटनेत कुठेच लिहिलेलं नाही, की भारताच्या प्रत्येक संस्थेत एकच संघटना आरएसएसचे लोक असायला हवेत. या राज्यघटनेत कुठेच लिहिलेलं नाही की भारतामधील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आरएसएसचे असायला हवेत. या राज्यघटनेत कुठेच लिहिलेलं नाही, भारतामधील दुसऱ्या भाषा तामिळ, बंगालीला दाबलं गेलं पाहिजे. कुठंच लिहिलेलं नाही. पण आरएसएस आणि भाजप रोज या राज्यघटनेवर आक्रमण करत आहेत. यांना केवळ काँग्रेसच रोखू शकते, अन्य पक्ष रोखू शकत नाही. '' असं म्हणत राहुल गांधींनी टीका केली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com