Rahul Gandhi On OBC Voters: गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेस अधिवेशन होत आहे. दोन दिवसांच्या या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या रणनीती विषयी राहुल गांधी यांनी आपले मत मांडले.
मिडिया रिपोर्टनसुार राहुल गांधी यांनी म्हटले की, 'काँग्रेस दलित, मुस्लिम, ब्राम्हण यामध्ये गुंतून राहिली आणि ओबीसी आपल्यापासून दूर निघून गेले.'
'अल्पसंख्याकांबद्दल, विशेषतः मुस्लिम समुदायाबद्दल काँग्रेस बोलते तेव्हा त्यावर टीका होते. काँग्रेस नेत्यांनी या टीकेला घाबरण्याचे कारण नाही. पक्षाने असे मुद्दे उपस्थित करावेत आणि संकोच न करता आपले विचार व्यक्त करावेत.', असे राहुल गांधी यांनी म्हटले.
महात्मा गांधींच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची शतकपुर्ती आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 व्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर होत असलेल्या या अधिवेशनातून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी महात्मा गांधीजींच्या मार्गाने चालण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. तसेच काँग्रेस नेते दादाभाई नौरोजी, वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करत गुजरातच्या या पुत्रांनी काँग्रेसचे नाव जगभर पोहोचवले, असे गौरवउद्गार काढले.
मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, भाजप समाजामध्ये फूट पाडून मुलभूत मुद्यांपासून लक्ष विचलित करते. देश फक्त काही लोकांच्या हातामध्ये कसे राहील यासाठी भाजप प्रयत्न करून प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.
खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अधिवेशनातील आपल्या भाषणात म्हटले की, आहे ही परिस्थित राहिली तर एक दिवस नरेंद्र मोदी सरकार आणि स्वतः नरेंद्र मोदी या देशाची संपत्ती विकून स्वतः निघून जातील. एअरपोर्ट, खाणी, मीडिया हाऊस मोदी हे सगळं आपल्या उद्योगपती मित्रांना देत असून हे देशाच्या सुरक्षेसाठी संकट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.