
Rahul Gandhi Shares Viral Video Targeting PM Modi : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आल्यावरून पंतप्रधान मोदींच्या एका टिप्पणीचा हवाला देत, आरोप केला की मोदींनी भारताच्या सन्मानाशी तडजोड केली. शिवाय, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींनी उद्देशून तीन प्रश्नही विचारले आहेत.
पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधन केल्याच्या व्हिडिओमधील एक भाग राहुल गांधी यांनी एक्सवर शेअर केला, ज्यामध्ये मोदींनी म्हटले आहे की, ‘’लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्या पातळीवर झालेल्या चर्चेदरम्यान, पाकिस्तानने आश्वासन दिले की त्यांच्याकडून यापुढे कोणतीही दहशतवादी कारवाई आणि लष्करी दुस्साहस केले जाणार नाही, ज्यानंतर भारतानेही त्यांच्या विधानाचा विचार केला.’’
मोदींचा हा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी मोदींना काही प्रश्न केले आहेत. राहुल गांधी म्हणतात मोदीजी पोकळ भाषणं देणं बंद करा. फक्त एवढंच सागा - १. दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास का ठेवला?, २. ट्रम्प समोर झुकून तुम्ही भारताच्या हितांचं बलिदान का दिलं?, ३. तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का गरम होतं? आणि तुम्ही भारताच्या सन्मानाशी तडजोड केली आहे, असा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.
भारत आणि पाकिस्तानातील संघर्ष थांबला असला तरी आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. याआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या एका विधानावरून भारताची किती विमाने आपण गमावली, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून भाजपने राहुल गांधीविषयी वादग्रस्त फोटो शेअर करत टीकास्त्र सोडले होते.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी केली आहे. त्यांनी याबाबतचा एक फोटो एक्सवर पोस्ट केला आहे. तसेच पाकिस्तानचा लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि राहुल यांचा अर्धा चेहरा असलेला फोटोही एक्सवर शेअर करत त्यांनी टीका केली होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.