Prajwal Revanna Scandal : राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल, म्हणाले 'एका मास रेपिस्टला..'

Rahul Gandhi Vs Pm Modi : राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदींना पाठवलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर निशाणा साधला आहे, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama

Prajwal Revanna Case : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना दुसरे पत्र पाठवून महिलांचे यौन शोषण प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाचा राजकीय पासपोर्ट तत्काळ रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करून पंतप्रधान मोदींकडे ही मागणी केली होती.

यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी सिद्धरामय्या यांची ही पोस्ट रिट्वीट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि त्यांना सवाल केला की, 'एका मास रेपिस्टला तुम्ही का वाचवत आहात पंतप्रधान महोदय? अशी पण तुमची काय मजबुरी आहे?' Prajwal Revanna Scandal

Rahul Gandhi, PM Narendra Modi
HD Deve Gowda : 'माझ्या संयमाची परीक्षा पाहू नकोस, लवकरच...' ; प्रज्ज्वल रेवण्णाला देवगौडांचा कडक इशारा!

दरम्यान माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांनीही त्यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णाला भारतात येऊन आत्मसमर्पण करण्याचा कडक इशारा दिला आहे. हसन मतदारसंघाचा खासदार असेलला प्रज्ज्वल रेवन्ना कथितरित्या 27 एप्रिल रोजी जर्मनीला रवाना झाला आहे आणि अद्यापही फरार आहे. इंटरपोलने त्याच्या शोधासाठी ब्लू कॉर्नर नोटीसही जारी केली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र -

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींना(PM Modi ) लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हे अतिशय निराशाजनक आहे की एवढ्या गंभीर प्रकरणात आधीच त्यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या पत्रावर काहीही उत्तर देण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी याआधी 1 मे रोजी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून प्रज्ज्वल रेवण्णाचा राजकीय पासपोर्ट रद्द करण्यासाठी परराष्ट्र आणि गृहमंत्रालयास त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली होती.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Sex Scandal Case : प्रज्वल रेवण्णाच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर आता अटक वॉरंट जारी!

याप्रकरणी माजी पंतप्रधान एचडी देवगौडा(HD Deve Gowda) यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मी प्रज्ज्वल रेवण्णाला इशारा दिला आहे की, तो जिथे कुठं असेल तिथून त्याने तत्काळ परत यावे आणि इथे भारताच्या कायदेशीर प्रक्रियेत सहभागी व्हावे, त्याने अजून माझ्या संयमाची परीक्षा पाहू नये. तसेच, जर त्याच्यावरील आरोप खरे सिद्ध झाले तर त्यालाा कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com