Rahul Gandhi on Loksabha Result : राहुल गांधी म्हणाले, 'सिद्धू मूसेवालाच्या 'या' गाण्यात 'I.N.D.I.A' आघाडीच्या जागांचा आकडा'

I.N.D.I.A Alliance Loksabha Result Seats : सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर कालच एक्झिट पोल समोर आले आहेत, ज्यामध्ये देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येताना दिसत आहे.
Rahul Gandhi and Sidhu Moosewala
Rahul Gandhi and Sidhu Moosewala Sarakarnama

Rahul Gandhi and Sidhu Moosewala : देशात लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान शनिवार (1 जून) संपले आणि त्यानंतर लगेचच एक्झिट पोलची आकडेवारीही समोर आली. यानुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे दिसत आहे. कालच्या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंडिया आघाडीनेही महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

एक्झिट पोलची आकडेवारी समोर येण्याआधी झालेल्या या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांनी इंडिया आघाडीला या लोकसभा निवडणुकीत 295 जागा मिळतील याबाबत भाष्य केलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर रविवार(2 जून) काँग्रेसने पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, विधिमंडळाचे नेते आणि प्रदेशाध्यक्षांची बैठकी बोलावली होती. दिल्ली स्थित काँग्रेस मुख्यालयात झालेल्या या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी(Rahul Gandhi) आणि सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्ष नेत्यांना मार्गदर्शन केलं.

Rahul Gandhi and Sidhu Moosewala
Mallikarjun Kharge : मोदी सरकार जाणार; INDIA आघाडीला बहुमत मिळणार; काँग्रेसच्या नेत्यानं आकडाच सांगितला...

या बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी एक्झिट पोलची आकडेवारी पूर्णपणे फेटाळून लावली. एक्झिट पोल संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या एका गाण्याचा दाखला देत म्हटले की, सिद्धू मूसेवालाचं(Sidhu Moosewala) गाणं आहे 295, आपण 295 जागा जिंकणार आहोत.

तर काँग्रेस सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी म्हटले की, आम्ही आपल्या प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष, मुख्यमंत्री, प्रभारी आणि उमेदवारांशी चर्चा केली आहे. त्या सर्वांना पूर्णपणे खात्रा आहे. हा एक्झिट पोल सरकारसाठी एक बनावट पोल आहे. इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील आणि निश्चितपणे सरकार बनेल.

Rahul Gandhi and Sidhu Moosewala
INDIA Bloc Meeting : 'आखिर तक डटे रहो!' निकालापूर्वीच इंडिया आघाडी अलर्ट...

उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रमुख आणि वाराणासी जागेवरील उमेदवार अजय राय यांनी म्हटले की, 4 जून रोजी समजेल एक्झिट पोल आणि भाजप कुठं आहेत. हे केवळ कार्यकर्त्यांवर मानसिकरित्या दबाव वाढवण्यासाठी केलं जात आहे. उलट यामुळे आमचे कार्यकर्ते अधिकच चार्ज झाले आहेत आणि सतर्क होऊन मतमोजणी करतील, शेवटपर्यंत लढत राहतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com