Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Rahul Gandhi Said Sorry : राहुल गांधी म्हणतात माफी मागत नाही; मग हे काय ? घ्या पुरावे !

Narendra Modi : राफेल प्रकरणात गांधींवर ओढावली नामुष्कीची वेळ
Published on

Congress Vs BJP Politics : नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून मोदी आडनाव असलेले प्रत्येकजण चोर का आहे, असा प्रश्न राहुल गांधींनी २०१९ मध्ये निवडणूक रॅलीत केला होता. त्यानंतर गुजरात भाजपचे नेते पूर्णेश मोदी यांनी गुन्हेगारी मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी सूरत न्यायालयाने राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने गांधींची खासदारकी रद्द केली.

दरम्यान, भाजपने 2019 च्या त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागा आणि वादावर पडदा टाकण्याचे आवाहन केले होते. त्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी, "मी गांधी आहे, सावरकर नाही. आणि गांधी माफी मागत नाहीत." असे वक्तव्य केले. यापूर्वीही त्यांनी ट्वीटरवर सावरकर समझा क्या... गांधी हूँ.. असा मजकूर पोस्ट केला होता. दरम्यान, 'मी गांधी आहे, माफी मागायला सावरकर नाही', असे वारंवार वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींनी यापूर्वी दोन वेळा विनाअट माफी मागितली आहे. यात राफेल प्रकणातील 'चौकीदार चोर है' हे वक्तव्य आणि 'चौकीदार चोर असल्याचे सुप्रिम कोर्टाने मान्य केले' याचा समावेश आहे.

Rahul Gandhi
Pune Politics : कोथरूडमधूनच का लढलो; चंद्रकांतदादांनी अखेर सांगितले खरे कारण!

अमेठीतील (Amethi) एका सभेत १० एप्रिल २०१९ रोजी प्रचार करताना, राहुल गांधी म्हणाले की, "आज मी खूप खूश आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी म्हणतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एअरफोर्सचे पैसे चोरून अनिल आंबानी (Anil Ambani) यांना दिले आहेत. ती बाब आज सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे."

राहुल गांधींच्या या विधानाविरोधात भाजप (BJP) नेत्या मीनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना नोटीस बजावली होती. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१९ रोजी राहुल गांधींनी मी अजाणता आणि अनवधानाने म्हटलेले, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच विधानाबाबत सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.

Rahul Gandhi
Parbhani Loksabha News : महाविकास आघाडीने जोर लावला, तरी परभणीत जाधवांना नाराजी भोवणार ?

या प्रकरणी राहुल गांधींच्या वक्तव्यातील ' नरेंद्र मोदी चोर आहे, हे सुप्रिम कोर्टाने मान्य केले', यावरही आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर राहुल गांधींनी खेद व्यक्त केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांच्याकडून न्यायालयाला “चुकीच्या पद्धतीने श्रेय दिल्याबद्दल” स्पष्टीकरण मागितले. राहुल गांधींनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरही सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला होता.

तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी एका सुनावणीदरम्यान सांगितले होते की, गांधी यांनी चुकीचे श्रेय दिल्याचे मान्य केले होते परंतु ते त्यावर ठाम आहेत. नंतर, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींच्या प्रतिज्ञापत्रांवरही आक्षेप घेतला. न्यायालयाने ‘खेद’ म्हणजे ‘माफी’ नाही असे म्हटले होते आणि राहुल यांना बिनशर्त माफी मागण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने पुढे सांगितले, "या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिल्यानंतर, आम्ही गांधींचे स्पष्टीकरण घेणे योग्य समजतो."

ही बाब राहुल यांच्या प्रतिमेला धक्का देणारी आणि त्यांच्या पक्षासाठी लाजिरवाणी ठरली होती. त्यावेळी ‘प्रचाराच्या उकाड्यात’ म्हटल्याचे कबूल करत राहुल गांधी यांनी बिनशर्त माफी मागितली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com