Rahul Gandhi latest news : ''भाजप अन् 'RSS'ला फक्त काँग्रेसच रोखू शकते बाकी पक्ष नाही, कारण...'' ; राहुल गांधींचं मोठं विधान!

Rahul Gandhi Targets BJP and RSS in Latest Statement : वक्फ विधेयक धर्म स्वातंत्र्यावर आणि राज्यघटनेवर आक्रमण आहे, असंही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटलं
Rahul Gandhi delivers a strong political statement claiming that only the Congress can effectively oppose BJP and RSS.
Rahul Gandhi delivers a strong political statement claiming that only the Congress can effectively oppose BJP and RSS Sarkarnama
Published on
Updated on

Congress vs BJP, RSS politics : काँग्रेसचं ८४वे अधिवेशन गुजरातमधील अहमदाबादेत सुरू आहे. या अधिवेशनात आज(बुधवार) काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलताना भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना, एक मोठं विधान केलं. ज्यामुळे राजकीय वर्तुळात विशेषकरून विरोधी पक्षांच्या आघाडीत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

राहुल गांधी म्हणाले, ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS) आणि भाजप रोज राज्य घटनेवर आक्रमण करत आहेत. त्यांना केवळ काँग्रेस पक्षच रोखू शकतो, बाकी पक्ष नाही रोखू शकत. तुम्ही बघा. कारण, ही विचारधारेची लढाई आहे. ज्या पक्षाकडे विचारधारा नाही, स्पष्टता नाही. तो पक्ष भाजप, आरएसएस समोर उभा राहू शकत नाही.ज्या पक्षाकडे विचाराधारा आहे. तोच पक्ष आरएसएस आणि भाजपचा मुकाबला करू शकतो आणि तोच आरएसएस आणि भाजपला हरवेन.''

Rahul Gandhi delivers a strong political statement claiming that only the Congress can effectively oppose BJP and RSS.
Rahul Gandhi on BJP : ''महाराष्ट्राच्या लोकांना विचारा, ते सांगतील भाजपने निवडणूक..'' ; राहुल गांधींनी साधला निशाणा!

याशिवाय ''स्वातंत्र्य युद्धात आपण केवळ इंग्रजांशी लढलो नव्हतो. आपण इंग्रज आणि आरएसएसच्या विचारधेरच्या विरोधात लढलो होतो. या सर्व आरएसएसच्या लोकांची विचारधारा स्वातंत्र्य युद्धाची विचारधारा नाही. ज्या दिवशी राज्यघटना लागू झाली होती, ज्या दिवशी हे राज्यघटना लिहिली गेली होती, त्या दिवशी या राज्यघटनेच्याविरोधात आरएसएसने रामलिला मैदानात ही राज्यघटना जाळली होती. त्यांची विचारधारा राज्यघटनेच्या विरोधात आहे. ते लोकशाहीला संपवू इच्छितात.'' असा आरोप राहुल गांधींनी(Rahul Gandhi) केला.

तसेच, ''ते भारतामधील सर्वच्या सर्व संस्था नियंत्रणात आणू इच्छितात आणि भारताची सर्व संपत्ती अंबानी, अदाणीच्या स्वाधीन करून देवू इच्छितात. आमची विचारधारा सांगते की, हा देश प्रत्येक जातीचा, धर्माचा आहे. प्रत्येक भाषेचा आहे. या देशातील संस्था केवळ एका संघटनेच्या नाहीत. या देशातील जनतेच्या आहेत. जनतेचे त्या संस्थांवर नियंत्रण असायला हवे. ही लढाई सुरू आहे.'' असं राहुल गांधींनी सांगितलं.

Rahul Gandhi delivers a strong political statement claiming that only the Congress can effectively oppose BJP and RSS.
Mallikarjun Kharge : काम करायचे नसेल तर निवृत्त व्हा! कामचुकार नेत्यांना इशारा देताना खर्गेंनी केली मोठी घोषणा

याचबरोबर ''काही दिवसआधी भाजपने(BJP) लोकसभेत वक्फ विधेयक पारीत केलं. वक्फ विधेयक धर्म स्वातंत्र्यावर आक्रमण आहे. राज्यघटनेवर आक्रमण आहे. आम्हाला वाटतं प्रत्येक समाज, प्रत्येक भाषेला या देशात सन्मान मिळायला हवा. आम्हाला वाटतं की हा देश सर्वांचा असावा. प्रत्येक धर्म, जात, भाषेला या देशाकडून फायदा मिळावा.'' अशा शब्दांत राहुल गांधींनी आपले विचार मांडले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com