Sudhir More Death Case| सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण; 'त्या' बाईने माझ्या बापाचा छळ केला; मुलाच्या दाव्याने खळबळ

Sudhir More Death Case Update : संशयित आरोपी महिलेने आपले घर बदलले आहे..
Sudhir More Death Case Update
Sudhir More Death Case UpdateSarkarnama

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir more) यांच्या आत्महत्येने मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी नवी माहिती समोर येत आहे. मोरे यांच्या आत्महत्येप्रकरणी माजी आमदार शांताराम चव्हाण यांची मुलगी निलिमा चव्हाण (Nilima Chavan) यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलिमा चव्हाण आणि सुधीर मोरे यांच्यात शेवटचा संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

निलिमा चव्हाण या माजी आमदार शांताराम चव्हाण यांच्या मुलगी आहेत. तसेच त्या निष्णात वकील देखील आहेत. मोरे यांच्या मुलाने निलिमा चव्हाण यांनी आपल्या वडीलांचा छळ केल्याचे म्हंटले आहे. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. यानंतर आता त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे.

Sudhir More Death Case Update
Modi Will Contest Lok Sabha In Pune : गुजरात, यूपीनंतर मोदी लोकसभा लढविणार महाराष्ट्रात?; काँग्रेसच्या 'या' आमदाराने दिले आव्हान

एका वृत्तवाहिनीशी बोलताना रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, “आम्ही रेल्वे स्टेशनवरील संबंधित ठिकाणची सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. आत्महत्येपूर्वी मोरे फोनवर बोलत असल्याचे दिसून आले आहे. निलिमा चव्हाण यांच्या घरीसुद्धा जाऊन पडताळणी केली. मात्र त्यांनी त्यांचं राहत घर बदललं आहे, अशी माहिती मिळाली. आम्ही त्यांनी चौकशीसाठी बोलवणाप आहोत," असे अधिकारी म्हणाले.

माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली होती. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकाजवळ ही घटना घडली. दरम्यान निलिमा चव्हाण आणि मोरे यांच्यात शेवटचा संवाद घडून आला होता. त्यानुसार आता निलिमा चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Sudhir More Death Case Update
NCP Meeting News : राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना प्रथमच मिळाली नेतृत्वाची संधी !

कोणे होते सुधीर मोरे ?

विक्रोळी परिसरातील सामाजिक कामात सुधीर मोरे सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने एक सच्चा शिवसैनिक गमावला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. मोरे यांच्यावर काही वर्ष रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी होती. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com