Amit Shah, Rahul Gandhi
Amit Shah, Rahul GandhiSarkarnama

Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू! भाजप प्रवक्त्याची धमकी, काँग्रेसने थेट शहांकडे केली मोठी मागणी

Rahul Gandhi Threat: BJP Spokesperson’s Controversial Statement : के. सी. वेणुगोपाल यांनी दावा केला आहे की, महादेव हे एबीव्हीपीचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. सध्या ते भाजपचे प्रवक्ते आहेत.
Published on

थोडक्यात महत्वाचे :

  1. राहुल गांधींना धमकीचा दावा: काँग्रेसने आरोप केला आहे की भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी मल्याळम टीव्हीवरील चर्चेत राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली.

  2. काँग्रेसचा आक्रमक पवित्रा: के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आणि ही कृती राहुल गांधींविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप केला.

  3. सुरक्षेबाबत शंका: काँग्रेसने सीआरपीएफच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींच्या सुरक्षेची अधिक काळजी घेण्याची मागणी केली आहे.

Congress Reacts Strongly, Demands Amit Shah’s Intervention : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना टीव्हीवरील लाईव्ह कार्यक्रमात भाजप प्रवक्त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. याबाबत काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. या धमकीनंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.

वेणुगोपाल यांनी शहांना लिहिलेल्या पत्रात भाजप प्रवक्ते पिंटू महादेव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, भाजपने महादेव यांच्याविरोधात त्वरीत कारवाई केली नाही तर ही कृती राहुल गांधी यांच्या विरोधातील षडयंत्र असल्याचे समजले जाईल. महादेव यांनी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

वेणुगोपाल यांनी दावा केला आहे की, महादेव हे एबीव्हीपीचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. सध्या ते भाजपचे प्रवक्ते आहेत. त्यांनी एका मल्याळम टीव्ही चॅनेलवर चर्चेदरम्यान हे वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधी यांच्या छातीत गोळी मारली जाईल, अशी घोषणा खुलेआमपणे महादेव यांनी केल्याचा दावा वेणुगोपाल यांनी पत्रात केला आहे.

Amit Shah, Rahul Gandhi
India vs Pakistan : पंतप्रधान मोदींचा घाव ‘पाक’च्या जिव्हारी; संरक्षणमंत्री बरळले, युध्दाचा स्कोर तर 6/0...

महादेव यांची घोषणा म्हणजे जाणीवपूर्वक केलेले विधान आहे. जीभ घसरली, असे त्याला म्हणता येणार नाही. विरोधी पक्षनेत्याला जाणीवपूर्वक दिलेली धमकी आहे. सत्ताधारी पक्षातील बहुतेक प्रवक्त्यांकडून अशाप्रकारे विषारी षब्दांचा वापर करून केवळ राहुल गांधी यांच्या जीव धोक्यात येत आहे तर संविधान आणि कायद्यानुसार नागरिकांना मिळालेल्या सुरक्षित जीवनाचा हक्कही हिरावला जात आहे.    

वेणुगोपाल यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सीआरपीएफलाही पत्र लिहून सुरक्षेबाबत सतर्क केले आहे. सीआरपीएफने राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत मल्लिकार्जून खर्गे यांना लिहिलेले पत्र संशयास्पद पध्दतीने मीडियापर्यंत पोहचते. यामागे सीआरफीएफच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. यापार्श्वभूमीवर भाजप प्रवक्त्याने दाखवलेली हिंमत म्हणजे यातून मोठ्या षडयंत्राचा वास येत असल्याचे वेणुगोपाल यांनी पत्रात नमूद केले आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: धमकी कोणी दिल्याचा काँग्रेसचा दावा आहे?
A: काँग्रेसने भाजप प्रवक्ते प्रिंटू महादेव यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

Q2: ही धमकी कुठे दिली गेली?
A: मल्याळम टीव्ही चॅनेलवरील चर्चेदरम्यान ही धमकी दिल्याचा दावा आहे.

Q3: काँग्रेसने कोणती पावले उचलली?
A: काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी अमित शाह आणि सीआरपीएफला पत्र लिहून त्वरित कारवाई व अधिक सुरक्षा मागितली.

Q4: काँग्रेसने या घटनेला काय म्हटले आहे?
A: काँग्रेसच्या मते ही राहुल गांधींविरोधातील जाणीवपूर्वक धमकी आणि मोठ्या षडयंत्राचा भाग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com