Ramdas Athawale allegation : ''राहुल गांधी अन् उद्धव ठाकरेंनी केला हिंदूंचा अपमान'' ; रामदास आठवलेंचा आरोप!

Ramdas Athawale allegation on Rahul Gandhi and Uddhav Thackeray : दिल्लीत मुख्यमंत्री कार्यालायतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगतसिंह यांचे फोटो हटवण्यात आल्याबाबतही आठवलेंनी दिली आहे प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले ?
Ramdas Athawale, Rahul Gandhi, Uddhav Thackeray
Ramdas Athawale, Rahul Gandhi, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Ramdas Athawale latest news : केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी महाकुंभमध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी न गेल्यावरून निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींनी कुंभ मेळ्यात स्नानासाठी जायला हवं होतं. त्यांनी तिथे न जाऊन हिंदूंचा अपमान केला आहे.

रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी म्हटले की, महाकुंभमध्ये 65 कोटींपेक्षा अधिक भाविकांनी स्नान केले. ही संधी 144 वर्षानंतर आली होती. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो, परंतु राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी कुंभमेळ्यात स्नानासाठी गेलं पाहीजे होतं. या नेत्यांनी हिंदू मतदारांच्या भावनांचा सन्मान केला पाहिजे होता, विशेषकरून तेव्हा जेव्हा ते स्वत: हिंदू आहेत. त्यांचे मत आहे की, उद्धव ठाकरे जे नेहमी हिंदुत्वाबाबत बोलतात, त्यांचे अशाप्रसंगी न जाणे चुकीचे आहे आणि हा हिंदूंचा अपमान आहे.

Ramdas Athawale, Rahul Gandhi, Uddhav Thackeray
Modi Government Scheme : मोदी सरकारची नवी पेन्शन स्कीम; नोकरीची अट नाही, कुणाला मिळणार फायदा?

तसेच रामदास आठवलेंनी म्हटले की, हिंदू मतदारांनी या नेत्यांवर बहिष्कार टाकयला हवा आणि निवडणुकांमध्ये त्यांना धडाही शिकवला पाहीजे. मुस्लिम मतदारांना लुभवण्यासाठी  ते महाकुंभास गेले नाहीत. परंतु त्यांनी हेह सांगितले की मुस्लिम मत भाजपलाही मिळतात, म्हणून त्यांना हे पाऊल उचलण्याची आवश्यकता नव्हती. याचबरोबर रामदास आठवले यांनी पुढे म्हटले की, भाजपचे नेतृत्व देशाला पुढे नेत आहे आणि हे दोन्ही ते मोदींच्याविरोधात जी नाराजी दाखवत आहे, त्याचा त्यांना काहीच फायदा होणार नाही.

दिल्लीत आम आदमी पार्टीकडून(AAP) भाजपवर आरोप केला गेला की, त्यांनी मुख्यमंत्री कार्यालायतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगतसिंह यांचे फोटो हटवले आणि त्या जागी महात्मा गांधी, राष्ट्रपती मुर्मू व पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावले. यावर रामदास आठवलेंनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात जास्त सन्मान देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. तसेच त्यांनी हेही सांगितले की भाजपे कधी आंबेडकरांचा फोटो हवला नाही, कदाचित हे काम आम आदमी पार्टी सरकारने केले असेल. त्यांनी आशावाद व्यक्त केला की लवकरच आंबेडकरांचा फोटो परत लावला जाईल.

Ramdas Athawale, Rahul Gandhi, Uddhav Thackeray
Sudhakar Badgujar Politics: शिवसेना ठाकरे पक्षाचे बडगुजर आणि महायुतीचा 'सेकंड राउंड रिवेंज' सुरू?

याशिवाय तेलंगणा सरकारद्वारे तेलगु हा विषय शाळेत अनिवार्य बनवण्याच्या मुद्य्यावर आठवलेंनी म्हटले की हिंदीचा विरोध करणे ठीक नाही. परंतु त्यांनी हेही म्हटले की, जर तेलंगणमध्ये तेलगुला महत्त्व दिले जात असेल तर हे देखील ठीक आहे. जसं महाराष्ट्रात मराठी भाषेला महत्त्व दिले जाते.

आठवलेंनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची स्तुती करताना म्हटले की, ते चांगलं काम करत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांना फिक्सर म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी म्हटले की एकनाथ शिंदे हे एक चांगले कार्यकर्ता राहिले आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मोठा सन्मान दिला होता. त्यांनी हेही म्हटले की जर उद्धव ठाकरे भाजपसोबत येत असतील, तर ती एक फार चागंली बाब असेल, परंतु भाजपला त्यांची आवश्यकता नाही कारण त्यांच्याकडे बहुमत आहे.

*(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)*

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com