Sudhakar Badgujar Politics: शिवसेना ठाकरे पक्षाचे बडगुजर आणि महायुतीचा 'सेकंड राउंड रिवेंज' सुरू?

Deepak Badgujar; court cancel anticipatory Bell of Deepak Badgujar in Gun firing case-शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांचा जामीन रद्द
Sudhakar Badgujar, Girish Mahajan & Eknath Shinde
Sudhakar Badgujar, Girish Mahajan & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Sudhakar Badgujar News: आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे पक्ष विस्तारासाठी प्रयत्नशील आहे. त्यांचा प्रमुख विरोधक शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांसाठी दिवस-रात्र ‘ऑपरेशन’ सुरू आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे सत्ताधारी पक्षाचे विशेष लक्ष्य आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांच्या विरोधात सत्तेच्या माध्यमातून विविध अडथळे निर्माण केले जात होते. त्यातूनच बडगुजर यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू होता.

Sudhakar Badgujar, Girish Mahajan & Eknath Shinde
Shirpur Toll Tax: रस्ता ९०० कोटींचा, वसुली २००० कोटींची, तरीही सवलतीला नकार!

आता त्यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांचा अटकपूर्व जामीन रद्द झाला आहे. सिडकोतील दोन वर्षांपूर्वीच्या प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबाराचे प्रकरण उघडण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी "मकोका"ची कारवाई केली आहे.

Sudhakar Badgujar, Girish Mahajan & Eknath Shinde
Ajit Pawar Politics: शरद पवारांना धक्का, माजी नगरसेवक नाना महाले अजित पवारांच्या पक्षात!

यामध्ये आधीच सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यात दीपक बडगुजर यांनी जिल्हा सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळविला होता. "मकोका"च्या कारवाई विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळविला होता. आता याच तांत्रिक मुद्द्यावर त्यांचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना ठाकरे पक्षाचे बडगुजर हे संभाव्य उमेदवार होते. त्यांनी प्रत्यक्षात नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देखील केली होती. त्यामुळे त्यांची नाकेबंदी करण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून विविध खटल्यांचा ससेमीरा सुरू झाला होता. त्यात शिवसेना विरुद्ध सत्ताधारी पक्ष असे जोरदार राजकीय नाट्य रंगले होते.

विधानसभा निवडणुकीत बडगुजर पराभूत झाले. त्यानंतर देखील त्यांच्यावरील राजकीय दबाव सुरूच होता. त्यामुळे ते भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. श्री बडगुजर हे देखील शिवसेनेत नाराज होते, असे देखील चित्र निर्माण केले होते.

या पार्श्वभूमीवर श्री. बडगुजर यांच्यातील सत्ताधारी पक्षाशी असलेले वैर संपुष्टात येईल, असा कयास बांधला जात होता. नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात शिवसेनेच्या विविध नगरसेवकांनी नेत्यांना प्रवेशासाठी मधाची बोटे लावण्यात आली होती. मात्र या पक्षाला फारसे यश मिळाले नाही.

त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा ‘सेकंड राउंड राजकीय रिवेंज’ सुरू होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. श्री बडगुजर सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. त्याची राजकीय किंमत त्यांना मोजावी लागली आहे. आता सत्ताधारी पक्षाकडून पुन्हा एकदा नव्याने डावपेच आखले जात असल्याने नाशिकचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com