Rahul Gandhi: राहुल गांधींची 'व्होटर अधिकार यात्रा' फेल! मार्गावरील अनेक मतदारसंघातील सर्व उमेदवार पराभूत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रा’ काढली, मात्र त्याचा काँग्रेसला काहीही फायदा झाला नसल्याचे दिसत आहे.
Rahul Gandhi- Tejashwi Yadav
Rahul Gandhi- Tejashwi YadavSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रा’ काढली, मात्र त्याचा काँग्रेसला काहीही फायदा झाला नसल्याचे दिसत आहे. या यात्रेच्या मार्गावरील बहुतांश मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि महाआघाडीचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.

Rahul Gandhi- Tejashwi Yadav
Navale Bridge Accident: स्पीड गन्स, वेगमर्यादा अन्...; अपघात रोखण्यासाठी कडक उपाय योजना; 'हे' अधिकारी राहणार जबाबदार

मतचोरी आणि मतदारयाद्यांमधील गैरप्रकारांचा आरोप करीत राहुल गांधी यांनी ऑगस्टमध्ये ‘व्होटर अधिकार यात्रा’ काढली होती. सासाराम येथून सुरू झालेल्या या यात्रेचा पाटण्यामध्ये समारोप झाला. यामध्ये १३०० किलोमीटरचा प्रवास करताना, २५ जिल्ह्यांतून आणि ११० विधानसभा मतदारसंघांतून त्यांनी प्रवास केला होता. यातील केवळ पाच जागांवर काँग्रेस यश मिळाले आहे.

Rahul Gandhi- Tejashwi Yadav
Congress: शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसही फुटणार? PM मोदींचे संकेत; नेमका काय खेळ सुरुए?

राहुल गांधी यांनी २०२२पासून भारत जोडो आणि भारत जोडो न्याय यात्रा काढल्या होत्या. त्याचा त्यांना लोकसभा निवडणुकीत फायदा झाला होता. तसेच, डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या तेलंगण विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला विजय मिळाला होता. या पार्श्वभूमीवर, बिहारमधील त्यांच्या या यात्रेमध्ये किती फायदा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Rahul Gandhi- Tejashwi Yadav
Vinod Tawade: बिहारमध्ये चालली विनोद तावडेंची जादू! पडद्यामागील चाणक्यनीतीनं काँग्रेस, राजद 'तबाह'

ही यात्रा सुरू असताना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. मात्र, प्रचार संपून मतदान होईपर्यंत हा उत्साह संपला आणि कार्यकर्त्यांमध्ये मरगळ निर्माण झाली. तसेच, पक्षांतर्गत गटबाजीचाही फटका बसल्याचे सांगण्यात येते. बेगुसराय येथील पोखरा येथे राहुल गांधी यांनी मासेमारीचा आनंद लुटला होता. याची बरीच चर्चा झाली होती. मात्र या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com