राहूल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार?: शरद यादव म्हणतात...

rahul gandhi देशात द्वेष पसरवला जात असून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे
राहूल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार?: शरद यादव म्हणतात...
Published on
Updated on

नवी दिल्ली : "राहूल गांधीना काँग्रेस अध्यक्ष बनवावे, तरच काहीतरी मोठे घडू शकते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सत्य लपवले जात आहे, पण हळूहळू सत्य बाहेर येईल, श्रीलंकेतही असाच प्रकार घडला, जिथे सत्य बाहेर आले. भारतातही सत्य बाहेर येईल, असे मत राष्ट्रीय जनता दलाचे नेते शरद यादव यांनी व्यक्त केले.

काँग्रेस नेते राहूल गांधी आज (८ एप्रिल) राजदचे नेते शरद यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. अलीकडेच शरद यादव यांनी लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला. या भेटीनंतर शरद यादव आणि राहूल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राहूल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार?: शरद यादव म्हणतात...
राजकारण तापले! राज ठाकरेंना बेड्या ठोकण्याची अबू आझमींची मागणी

राहूल गांधी यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'देशात वाईट परिस्थिती असल्याच्या शरद यादव यांच्या विधानाशी मी सहमत आहे. देशात द्वेष पसरवला जात असून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आपण देशाला एकत्र आणायचे आहे.

श्रीलंकेप्रमाणे भारतातही सत्य लवकरच बाहेर येईल. भारताच्या आर्थिक स्थितीची आणि नोकरीच्या स्थितीची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही असे पाहिले नसेल. या देशाच्या रोजगार रचनेचा कणा मोडला आहे. लघु आणि मध्यम व्यवसाय, छोटे दुकानदार, अनौपचारिक क्षेत्र हे आपला कणा आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रसारमाध्यमे, संस्था, भाजप नेते आणि आरएसएस देशातील सत्य लपवत आहेत, पण हळूहळू ते बाहेर येईल, असेही ते म्हणाले.

अर्थतज्ज्ञ आणि नोकरशहा इतर देशांकडे पाहून आपली योजना तयार करतात. पंतप्रधान म्हणतात की आपण त्यांच्यासारखे व्हायला हवे. पण असे करता येत नाही. प्रथम, आपण कोण आहोत आणि येथे काय घडत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. येत्या 3-4 वर्षात याचे भयानक परिणाम समोर येतील, अशा भितीही यावेळी राहूल गांधींनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com