
Rahul Gandhi will be the PM face : देशात सध्या मतचोरीच्या मुद्द्यावरुन घमासान सुरु आहे. तसंच बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून सुरु असलेलं मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनर्पडताळणी अभियानावरुन वाद-विवाद सुरु आहे. त्याचबरोबर बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरु झाली आहे.
या सर्व महत्वाच्या घडामोडींमध्ये पुढच्या २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून अर्थात इंडिया आघाडीकडून लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी घोषणाच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. त्यामुळं आता यावरुन वादाला तोंड फुटणार की राहुल गांधींची पंतप्रधानपदासाठीची प्रतिमा घट्ट होत जाणार? हे पाहावं लागणार आहे.
बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या निवडणुकीची घोषणा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण तत्पूर्वीच बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. कारण राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी संयुक्तरित्या बिहारच्या काही भागांमध्ये निवडणूक आयोगाविरोधात एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यावरुन 'वोट अधिकार रॅली' काढल्या आहेत. मंगळवारी बिहारच्या नवादा जिल्ह्यात रॅली निघाली, या रॅलीमध्ये तेजस्वी यादव यांनी आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली.
तेजस्वी यादव यांनी या रॅलीमध्ये राहुल गांधींनी सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांचे आभार मानले. म्हणाले, "राहुल गांधींना मी धन्यवाद देऊ इच्छितो की ते आज नवादा जिल्ह्यात येऊन जनतेला जागरुक करण्याचं काम करत आहेत. आता संपूर्ण नवादा एकजूट झाला असून यंदा आम्ही बिहारमध्ये एनडीएला उखडून टाकणार आहोत. तसंच पुढच्यावेळी जेव्हा लोकसभा निवडणूक होईल तेव्हा राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचं काम आम्ही करु"
दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या या विधानामुळं विरोधकांमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण निवडणुकीआधीच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करण्यावर काँग्रेस ठाम आहे. तर दुसरीकडं राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं ऑपरेश सिंदूरच्या लोकसभेतील चर्चेवेळी किंवा सध्याच्या मत चोरीच्या मुद्द्यावरुन भाजपला घेरण्याचं काम केलं आहे. त्यावरुन येत्या काळातही २०२९ पर्यंत जर असाच आक्रमकपणा कायम राहिला तर राहुल गांधी यांची प्रतिमा उजळत जाऊन विरोधकही त्यांनाच पुढचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून संमती देऊ शकतात, हे इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या भूमिकेवरुन स्पष्ट होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.