Rahul Gandhi News : राहुल गांधींची खासदारकी वाचणार का? : सूरत सत्र न्यायालयात उद्या आव्हान देणार

एकाचे म्हणणे होते की राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात जावे, तर दुसरा गट राहुल गांधी हे जेलमध्ये गेले तर पक्षाला सहानुभूती मिळेल आणि आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला त्याचा फायदा होईल.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : सूरत न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) हे उद्या (ता. ३ एप्रिल) सत्र न्यायालयात आव्हान देणार आहेत. शिक्षा सुनावल्यानंतर अखेर ११ दिवसांनी शिक्षेला आव्हान देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे सत्र न्यायालय उद्या काय म्हणतं, याकडे देशाचे लक्ष असणार आहे. (Rahul Gandhi will challenge the two-year sentence in the Sessions Court tomorrow)

कर्नाटकातील एका प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी यांनी 'सर्वच चोरांचे आडनाव मोदी का असते...’ असा सवाल उपस्थित केला होता. त्याबाबत गुजरातमधील आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावर सूरत न्यायालयाने 23 मार्च रोजी राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी (ता. २४ मार्च) राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल अकरा दिवसांनी सूरत सत्र न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Rahul Gandhi
Vikhe Patil Angry to Dhirendra Shastri : बागेश्वरबाबांच्या विधानावर विखे पाटील संतापले : ‘तथाकथित महाराजांचा वाचाळपणा बंद झाला पाहिजे’

सूरत न्यायालयाच्या निकालाला राहुल गांधी उद्या सत्र न्यायालयात आव्हान देणार आहेत. सत्र न्यायालयाकडून दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अपात्रतेची कारवाई रद्द होण्याचीही शक्यता आहे. मात्र, उद्या सत्र न्यायालय याबाबत काय म्हणतं, हे पाहणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार लक्षद्वीपचे खासदार महम्मद फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र, केरळ न्यायालयाने दिलासा देताच त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सूरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली तर त्यांना पुन्हा खासदारकी मिळू शकते.

Rahul Gandhi
Shivsena News : शिवसेनेचा राम म्हणून ओळख असलेल्या माजी जिल्हाप्रमुखांचा अखेर ‘जय महाराष्ट्र’ : भाजपत प्रवेश करणार

राहुल गांधी यांना झालेल्या शिक्षेच्या विरोधात कायदेशीर आणि राजकीय या दोन्ही आघाडीवर लढा देण्याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वाने घेतला आहे. पण, गांधी यांच्या शिक्षेवरून काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले होते. एकाचे म्हणणे होते की राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात जावे, तर दुसरा गट राहुल गांधी हे जेलमध्ये गेले तर पक्षाला सहानुभूती मिळेल आणि आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला त्याचा फायदा होईल, असे सांगितले जात होते. मात्र, अखेर पक्षाने तब्बल ११ दिवसानंतर उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com