Rahul Gandhi House Shifting: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा दणका: आता सरकारी बंगलाही सोडावा लागणार...

लोकसभा सदस्यत्व संपल्यानंतर राहुल गांधींना बंगला रिकामा करण्याची नोटीस मिळाली होती.
Rahul Gandhi House Shifting:
Rahul Gandhi House Shifting: Sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi House Shifting : काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच 10 जनपथवर स्थलांतरित होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या घरातील सामान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ येथील निवासस्थानी हलवण्यास सुरुवात झाली आहे. त्याचवेळी राहुलच्या ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या कार्यालयाचा शोधही सुरु झाला आहे. राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्यानंतर दोन दिवसांनी लोकसभा हाऊसिंग पॅनलने त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावली होती.

काँग्रेस नेते 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहत होते. 2004 मध्ये ते लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना हा बंगला देण्यात आला होता. नियमानुसार, त्यांना अपात्रतेच्या आदेशाच्या तारखेपासून (24 मार्च) एक महिन्याच्या आत त्यांचा सरकारी बंगला रिकामा करायचा होता. या नोटिशीला उत्तर देताना राहुल गांधी यांनी बंगला रिकामा करण्यासाठी नोटीसचे पालन करणार असल्याचे सांगितले होते.

Rahul Gandhi House Shifting:
Thackeray-BJP Politics : 'जर तुम्ही काडतूस आहात तर ठाकरी बाणा तोफ'; अंधारेंनी फडणवीसांना ठणकावलं

नोटीसला उत्तर देताना धन्यवाद म्हटले

त्यांनी लोकसभा सचिवालयातील उपसचिव मोहित राजन यांना पत्र लिहून 12, तुघलक लेन येथील माझे निवासस्थान रद्द करण्याबाबत 27 मार्च 2023 रोजी दिलेल्या तुमच्या पत्रासाठी धन्यवाद. गेल्या चार टर्ममध्ये लोकसभेचा निवडून आलेला सदस्य म्हणून हा जनतेचा आदेश आहे, ज्याचे श्रेय मी माझ्या काळातील आनंददायी आठवणींना देतो. माझ्या हक्कांबद्दल पूर्वग्रह न ठेवता, मी निश्चितपणे तुमचा आदेश पूर्ण करेन. असं राहुल गांधींनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.

दरम्यान, 2019 च्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. राहुल गांधींनी मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com