Thackeray-BJP Politics : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काल ठाण्यात मारहाण झाली.या घटनेनंतर पुन्हा एकदा ठाकरे-फडणवीसांमध्ये राजकारण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) फडतूस गृहमंत्री म्हणत टिका केली होती. त्या टिकेनंतर फडणवीसांनी मै फडतूस नही काडतूस हूं, अशा शब्दांत उत्तर दिलं. यानंतर आज महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आज ठाण्यात सभा घेत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी फडणवीसांच्या काडतूस शब्दालाही उत्तर दिलं आहे.
''तुम्हाला फडतूस शब्दाचा इतका राग आला, पण उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही सुपाऱ्या दिलेल्या सब क्रॉन्ट्रॅक्टर, तुमची उपकंत्राटदार नवनीत राणा दमची भाषा करते, राणेंची वाह्यात पोरं जेव्हा चड्डीत राहायची भाषा करतात, त्यावेळी तुमचा सद्सदविवेक कुठे गेलेला असतो. पण तरीही फडणवीस साहेब तुम्ही म्हणालात मै फडतूस नही काडतूस हू, मै झुकेगा नही घुसेगा साला म्हणालात आता देवेंद्र भाऊ आमचा साधा प्रश्न आहे २०१६ ला तुमच्या घरात एक बाई घुसते, तुमच्याच बायकोला फसवलं आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरात घुसायची भाषा करता, हे शोभलं तर पाहिजे.
२०१६ अनिक्षा जयसिंघानी आली, तुमच्या घरातून कॅमेऱ्यात काहीतरी रेकॉर्ड करुन गेली, आणि तुम्हाला तर पत्ताच नाही, काल सांगितलेली गोष्ट खरी आहे का, हे माझं म्हणण नाही, हे तुम्ही स्वत: सभागृहाच्या पटलावर मांडलेलं सत्य आहे, देवेंद्रभाऊ २०१६ पासून घरात घुसलेली जी बाई आहे तिचा बंदोबस्त करा, मग आमच्या घरात घुसण्याचा बाता करा.''
देवेंद्र जी अगर आप काडतूस है. जर तुम्ही काडतुसाचीच भाषा केली असेल, तर साहेब ठाकरे बाणा म्हणजे तोफ आहे आणि तोफेपुढे काडतुसाचा निभाव लागत नाही. इथला प्रत्येक शिवसैनिक छातीचा कोट करुन उभा आहे, काय गुन्हे टाकायचेत ते टाका, काय करायचं ते करा, सरफरोशी की तम्मन्ना अब हमारे दिल मे है देखना हैं जोर कितना बाजू ए कातील मैं हैं
याच वेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समाचार घेतला आहे. काल बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंना आम्ही मातोश्रीतून बाहेर पडू देणार नाही. ज्या आवेषात तुम्ही बोलतता. ते पाहिलात तर महाराष्ट्र भाजपमध्ये तुमचा दबदबा आहे. संघटनाही तुमचं ऐकते. मग मला एक सांगा जर तुमची इतकी ताकद, कुवत इतकी क्षमता, इतकी हिंमत आहे तर त्याच देवेंद्र फडणवीसांनी तुमचं तिकीट का कापलं, असा खोचक सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
अहो शेलारभाऊ तुम्हाला तुमची उमेदवारी वाचवता आली नाही, बावनकुळेंना स्वतची उमेदवारी वाचवता आली नाही, तरीही ते म्हणत असतील की उद्धव ठाकरेंना मातोश्रीबाहेर पडू देणार नाही, पण आम्ही सज्जन माणसं आहोत. आमच्या वाडवडिलांनी, गुरुंनी, नेत्यांनी आम्हाला चांगले संस्कार दिले आहेत. त्यामुळे दोन हात तिसरं मस्तक जोडून मी आपल्याला आव्हान देते हिंमत असेल तर ४८ तासात मातोश्रीवर या, असं खुलं आव्हानही यावेळी सुषमा अंधारे यांनी दिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.