Rahul Gandhi Letter to PM Modi : लोकसभेतील प्रचंड गदारोळानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले...

Rahul Gandhi and PM Narendra Modi at Loksabha : लोकसभेत बुधवारी 'या' मुद्य्यावर केली चर्चेची मागणी ; लोकसभेत मंगळवारी पंतप्रधान मोदींचं भाषण सुरू असताना प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला!
Rahul Gandhi and PM Modi
Rahul Gandhi and PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi On NEET Paper Leak : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, सरकारकडे बुधवारी लोकसभेत NEETच्या मुद्य्यावर चर्चा करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, माझे मत आहे की विद्यार्थ्यांच्या नीटच्या मुद्य्यावर चर्चा करणे योग्य राहील.

तसेच राहुल गांधींनी पत्रात असेही लिहिले आहे की, आमचा उद्देश केवळ 24 लाख नीट उमेदवारांच्या हिताशी रचनात्मकरित्या जुडणे आहे, ज्यांना उत्तर जाणून घेण्याचा हक्क आहे. मला वाटतं की तुम्ही या चर्चेचं नेतृत्व करणं योग्य राहील.

राहुल गांधींनी पत्रात नेमकं काय म्हटलं? -

पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) उद्देशून राहुल गांधी पत्रात म्हणतात, अपेक्षा आहे की पत्र मिळेपर्यंत आपण सकुशल असाल. मी नीटच्या मुद्य्यावर संसदेत चर्चेची विनंती करण्यासाठी हे पत्र लिहित आहे.

जसं की आपण जाणता, 28 जून रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहात या मुद्य्यावर चर्चेच्या विरोधकांच्या विनंतीला फेटाळण्यात आलं होतं. विरोधकांनी या मुद्य्यावर पुन्हा चर्चा करण्यासाठी मागणी केली होती. लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना आश्वासन दिलं होतं की, ते या मुद्य्यावर ते सरकारशी चर्चा करतील.

Rahul Gandhi and PM Modi
Rahul Gandhi : राहुल गांधींना बसला धक्का; मोदींना दोनदा उठावे लागलेल्या भाषणातील काही भाग हटवला...

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पत्रात पुढे म्हटले आहे की, संपूर्ण भारतातील जवळपास 24 लाख नीट उमेदवारांचं कल्याण व्हायला हवं, हीच आमची एकमेव चिंता आहे. लाखो कुटुंबांनी आपल्या पाल्याच्या पालनपोषणासाठी वैयक्तिक त्याग केला आहे. अनेकजणांसाठी नीटचा पेपर लीक होणं हे आयुष्यभराच्या स्वप्नांशी विश्वासाघातासारखं आहे.

आज हे विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय आपल्याकडून त्यांच्या लोकप्रतिनिधींकडे या समस्येचं निराकरण करण्यासाठी धाडसी आणि निर्णायक पावलं उचलली जाण्याची अपेक्षा करत आहेत. नीट परीक्षेचा मुद्दा तत्काळ लक्ष घालण्यासारखा आहे. कारण, यामुळे आपल्या उच्च शिक्षण प्रणालीतील गंभीर षडयंत्र उघडकीस आणलं आहे.

Rahul Gandhi and PM Modi
PM Narendra Modi : बालकबुध्दी... तुम से नही हो पायेगा! मोदींकडून राहुल गांधींवर कारवाईचे संकेत

याशिवाय, मागील सात वर्षांत 70 पेक्षा अधिक पेपर लीक झाले आहेत. ज्याचा दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे. सोमवारीही लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावादरम्यान केंद्र सरकारला घेरलं होतं आणि नीट पेपर लीकसह अनेक मुद्य्यांवरून जोरदार टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com