Verdict on Rahul Gandhi Petition : राहुल गांधींच्या खासदारकीचा फैसला २० एप्रिलला; काय घडलं कोर्टात?

Surat Court : सुनावणीत मानहानीचा खटला आणि दिलेली शिक्षा अयोग्य असल्याचा युक्तीवाद
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Surat Court and Rahul Gandhi : काँग्रेस नेते, माजी खासदार राहुल गांधी यांनी 'मोदी अडनावा'वरून वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून सूरत सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल होता. त्यात न्यायालयाने गांधींना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. दरम्यान, शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज (ता.१३) सुनावणी पूर्ण झाली आहे. तर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल २० एप्रिल रोजी सुनावला जाणार आहे.

Rahul Gandhi
Karnataka Election : भाजपचा आणखी सात विद्यमान आमदारांना डच्चू; २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

न्यायालयातील सुनावणीला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना उपस्थित न राहण्याची सूट दिली होती. गांधींच्या वतीने अॅड. आर. एस. चीमा यांनी न्यायालयासमोर म्हणणे मांडले. चीमा यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, "मोदी अडनावावरून केलेल्या वक्तव्यामुळे राहुल यांच्यावर मानहानीची केस दाखल करणे उचित नव्हती. तसेच या प्रकरणात दिलेली दोन वर्षांच्या शिक्षेचीही काही गरज नव्हती." दरम्यान या याचिकेवर भाजप नेते यांनी आपले म्हणणेही सादर केले. त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीकारक वक्तव्य करण्याची सवय झालेली आहे.

Rahul Gandhi
Satej Patil News : सतेज पाटलांवर काँग्रेसने दीड महिन्यातच दुसऱ्यांदा सोपवली मोठी जबाबदारी!

अॅड. चीमा म्हणाले की, "फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३८९ मध्ये अपील प्रलंबित असलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची तरतूद आहे. त्यात सत्ता हा अपवाद आहे. तसेच न्यायालयाने शिक्षेच्या परिणामांचा विचार करायला हवा होता. दोषीला कधीही भरून न येणारे नुकसान होईल का, याचा विचार न्यायालयाने केला पाहिजे. अशी शिक्षा मिळणे हा अन्याय आहे."

राहुल गांधी यांनी सूरत सत्र न्यायालयात मुख्य याचिका दाखल करून दोन अर्ज केले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला मुख्य याचिकेत आव्हान देण्यात आले होते. दोन अर्जांपैकी पहिला अर्ज शिक्षेला स्थगिती देण्याचा होता, तर दुसरा अर्ज शिक्षेला स्थगिती देण्याचा होता.

Rahul Gandhi
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा आणखी एक गौप्यस्फोट; शिंदे गट आक्रमक झाल्यानंतर आता थेट तारीखच सांगितली; म्हणाले...

दरम्यान, मानहानी खटल्याप्रकरणी राहुल गांधी यांना २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. शिक्षा जाहीर झाल्यानंतर काही वेळातच त्यांना ३० दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

खासदारकी रद्द झाल्यानंतर २७ मार्च रोजी लोकसभा गृहनिर्माण समितीने राहुल यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवली. समितीने त्यांना २२ एप्रिलपर्यंत १२ तुघलक रोड येथील सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले. राहुल यांनी बंगला रिकामा करून सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com