Karnataka Election : भाजपचा आणखी सात विद्यमान आमदारांना डच्चू; २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघासाठी कोणत्याही उमेदवाराची घोषणा केली नाही.
BJP
BJP Sarkarnama

बंगळूर : भाजपच्या (BJP) १८९ उमेदवारांच्या पहिल्या यादीनंतर बंडखोरी होऊनही बुधवारी रात्री २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत नऊ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली. पक्षाने दुसरी यादी जाहीर करताना विद्यमान आमदार नेहरू ओलेकर, एम. पी. कुमारस्वामी यांच्यासह आणखी सात आमदारांना डावलले आहे. (BJP announces second list of 23 candidates for Karnataka assembly elections)

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतलेल्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघासाठी कोणत्याही उमेदवाराची घोषणा केली नाही. अमित शहा (Amit Shah) यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने दुसरी यादी जाहीर केली.

BJP
BJP NEWS : भाजपचा आमदार राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार?

नुकतेच भाजपमध्ये सामील झालेले काँग्रेसचे नेते नागराज छब्बी यांना कलघटगीमधून निवडणूक लढवतील. पक्षाने मुद्दिगेरेचे आमदार एम. पी. कुमारस्वामी यांना डावलून दीपक दोड्डय्या यांची निवड केली. त्याचप्रमाणे शिवकुमार यांना चन्नगिरी जागेसाठी उमेदवारी दिली आहे. कारण विद्यमान आमदार माडाळ वीरुपाक्षप्पा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नुकतेच लोकायुक्त पोलिसांनी अटक केली होती, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनाही उमेदवारी दिलेली नाही.

BJP
Shahjibapu's U-Turn News : शहाजीबापूंची एका दिवसात पलटी : ‘राजकारणात कुठेही असलो तरी मी शरद पवारांची फांदी..’

या यादीत दोन महिलांचाही समावेश आहे. कुमारी ललिता अनापूर यांना गुरुमितकल कोलार गोल्ड फील्ड (एससी) जागेसाठी अश्विनी संपंगी यांची निवड केली आहे. उमेदवारांची तिसरी यादी गुरुवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी गमावलेले आमदार

बैंदूरचे आमदार सुकुमार शेट्टी, चेन्नगिरीचे माडाळ विरुपक्षाप्पा, कलघटगीचे निंबण्णावर लिंगाण्णा, मुडिगेरेचे एम. पी. कुमारस्वामी, हावेरीचे नेहरू ओलेकर, मायकोंडाचे एन. लिंगान्ना, गुरमितकलचे नागनगौडा कंदकूर.

BJP
Fadnavis's Predictions On SC Verdict : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत फडणवीसांनी केले भाकीत : ‘उद्धव ठाकरेंचे सरकार पुन्हा...’

भाजपच्या दुसऱ्या यादीतील मतदारसंघनिहाय उमेदवार

कलघटगी-नागराज छब्बी

चन्नगिरी-शिवकुमार

देवर हिप्परगी-सोमणगौडा पाटील

बसवाण बागेवाडी-एस. के. बेळूब्बी

इंडी-कासागौडा बिरादार

गुरुमितक-ललिता अन्नपूर

बिदर-ईश्‍वरसिंह ठाकूर

भालकी-प्रकाश खांद्रे

गंगावती-परण्णा मनवळ्ळी

हानग-शिवराज सज्जनार

हावेरी-गविसिद्धप्पा दमनवर

हरपनहळ्ळी-करुणाकर रेड्डी

दावणगेरे उत्तर-लोकिकेरे नागराज

दावणगेरे दक्षिण-अजय कुमार

मायकोंडा-बसवराज नाईक

बैंदूर-गुरुराज गट्टीहोळे

मुद्दीगेरे-दीपक दोड्डय्या

गुब्बी-एस. डी. दिलीपकुमार

शिडलघट्ट-रामचंद्र गौडा

कोलार गोल्डफिल्ड-अश्विनी संपगी

श्रवणबेळगोळ-चिदानंद

अरसीकेरे-बी. व्ही. बसवराजू

हेग्गडदेवनकोटे-कृष्णा नाईक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com