BJP Vs Congress : 'आम्ही रील्स बनवणारे नाही, तर काम करणारी माणसं'; रेल्वेमंत्र्यांच्या संतापाचं कारण काय?

Lok Sabha Session 2024 : मला येथे राजकारण करायचे नाही, वस्तुस्थिती सर्वांसमोर स्पष्टपणे मांडायची आहे, असे रेल्वेमंत्री म्हणाले.
Ashwini Vaishnaw
Ashwini VaishnawSarkarnama
Published on
Updated on

Railway News : देशातील वाढत्या अपघातावरून संसदेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. त्यावरून सत्ताधार आणि विरोधकांत मोठी खडांजगी झाली. त्यानंतर गुरुवारी सभागृहात अर्थसंकल्पवरील चर्चेवर बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांवर खोटेपणाचा आरोप केला.

त्यावर विरोधकांनी गदारोळ सुरू करताच वैष्णव यांनी, आम्ही तुमच्यासारखे रील्स बनवून दाखवणारे नाही, तर काम करणारे लोक आहोत, असा घणाघात केला.

रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील अनुदानाच्या मागण्यांवर लोकसभेत दोन दिवस जोरदार चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना वैष्णव म्हणाले की, रेल्वेतील जनरल डब्यांची मागणी वाढत आहे. ती लक्षात घेऊन सरकारने सुमारे 100 कोटी रुपयांच्या डब्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. अडीच हजार जनरल डबे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वंदे मेट्रो दोन शहरांदरम्यान कमी अंतरावर धावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकार योग्य पावले टाकत असताना काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष रेल्वेच्या सुरक्षेबाबत खोटेपणाचे दुकान चालवत असल्याचा आरोपही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केला. हे असे आहे की, आम्ही रील बनवणारे नाही, आम्ही काम करणारी माणसं आहोत. मला इथे राजकारण करायचे नाही, मला फक्त सर्वांसमोर सत्य स्पष्टपणे मांडायचे आहे, असा संतापच त्यांनी व्यक्त केला.

Ashwini Vaishnaw
Attack on Jitendra Awhad Car: मोठी बातमी! संभाजीराजेंबाबत वादग्रस्त विधान; स्वराज्य संघटनेनं जितेंद्र आव्हाडांची गाडी फोडली

ते म्हणाले की, गाड्यांच्या सुरक्षेसाठी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) प्रणाली 1970 आणि 1980 च्या दशकात जगातील बहुतेक देशांमध्ये स्थापित करण्यात आली होती, परंतु दुर्दैवाने, काँग्रेसच्या 58 वर्षांच्या कार्यकाळात आणि 2014 पर्यंत ही प्रणाली होऊ शकली नाही. आता रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी ‘कवच’ प्रणालीची आधुनिक आवृत्ती प्रत्येक रेल्वेत बसवली जाईल. किलोमीटरचे रेल्वे ट्रॅक नेटवर्कवर टाकण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही, असा विश्वासही वैष्णव यांनी व्यक्त केला.

Ashwini Vaishnaw
BJP; जिल्हाधिकारी दालनात भाजप नगरसेवकाचे अर्धनग्न आंदोलन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com