Attack on Jitendra Awhad Car: मोठी बातमी! संभाजीराजेंबाबत वादग्रस्त विधान; स्वराज्य संघटनेनं जितेंद्र आव्हाडांची गाडी फोडली

Swarajya Sanghatna News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे.
Jitendra Awhad.jpeg
Jitendra Awhad.jpegSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे यांचं रक्त हिरवं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विशाळगडाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना काही दिवसापूर्वी मांडली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी जात असताना स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांची गाडी पाठीमागे असतानाही हा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारली आहे.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विशाळगड प्रकरणावरुन स्वराज्य संघटना आक्रमक झाली होती.विशाळगड प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी टीका करताना त्यांनी संभाजीराजे यांचं रक्त हिरवं आहे का हे तपासावं लागेल असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे नवा वाद पेटला होता.

जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजेंची (Sambhajiraje Chhatrapati) माफी मागावी अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली होती.तसेच माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता.स्वराज्य संघटनेच्या इशार्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. विशाळगड प्रकरणावरुन आव्हाडांनी केलेली टीका त्यांना महागात पडणार असल्याचे बोलले जात होते.

Jitendra Awhad.jpeg
Video Ramdas Athawale: रामदास आठवले म्हणतात, ठाकरे- फडणवीसांमधला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच...

स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून या हल्ल्यानंतर तत्काळ एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.या व्हिडिओत स्वराज्य संघटनेचा एक कार्यकर्ता आपण या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली घेताना दिसून येत आहे. युवराज छत्रपतीराजे यांचं रक्त तपासावं लागेल की ते छत्रपती घराण्यातील आहे का, अशा प्रकारचं छत्रपतींच्या घराण्याशी बेताल वक्तव्य केलं,

व्हिडिओत काय म्हटलंय...?

जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तर पळाला नसतास, तू पळालास, ही सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राला समजली आहे की, तू पळपुटा आहेस. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेत असल्याचं या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकारी या व्हिडिओत सांगत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर तीन अज्ञातांनी हल्ला केला.आव्हाडांच्या ताफ्यातील पोलीस गाडी पाठीमागे असतानाही आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत आव्हाड यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तीन ते चार जणांना या हल्ल्याप्रकरणी अटक केली आहे.

Jitendra Awhad.jpeg
Swapnil Kusale : कोल्हापूरच्या पठ्ठ्याची ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी! मुख्यमंत्र्यांची शाबासकी अन् सतेज पाटलांकडून मोठं बक्षीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com