Video Raj Thackeray : भारतात नाहीतर 'या' देशात लोकशाही; कारण सांगत राज ठाकरे रोखठोक बोलले

Raj Thackeray In America : आपल्याकडे कधी लोकशाही नव्हतीच. कारण...; असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
raj thackeray
raj thackeraysarkarnama

भारतात लोकशाही नाही. आपल्याला लोकशाहीचा अर्थच कळला नाही. अमेरिकेत जी व्यवस्था आहे, तिला लोकशाही म्हणता येईल. याचं कारण माणूस सुशिक्षित असून चालत नाही. तो सुज्ञ असला पाहिजे, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

अमेरिकेत 'बीएमएम'च्या एकविसाव्या अधिवेशनात राज ठाकरेंची ( Raj Thackeray ) मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी राज ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, "भारतात लोकशाही नाही. आपल्याला लोकशाहीचा अर्थच कळला नाही. अमेरिकेत जी व्यवस्था आहे, तिला लोकशाही म्हणता येईल. याचं कारण माणूस सुशिक्षित असून चालत नाही. माणूस सुज्ञ असला पाहिजे. सुज्ञ असलेल्या ठिकाणी लोकशाही नांदते."

raj thackeray
Sharad Pawar : "लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणलं", राज ठाकरेंचं विधान अन् शरद पवारांनी मोजक्याच शब्दांत दिलं उत्तर...

"ऑस्करच्या व्यासपीठावरून मेरिल स्ट्रिप डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बोलतात. त्यानंतर मेरिल स्ट्रिपच्या कोणत्याही चित्रपटांना त्रास होत नाही. अशी लोकशाही दुसरीकडे कुठेही नाही," असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

"आपल्याकडे कधी लोकशाही नव्हतीच. कारण, हजारो वर्षे राजा आणि प्रजा, असंच वातावरण होतं. लोकसंख्येवर मोठी लोकशाही असल्याचा निष्कर्ष काढला जातो. त्याचा लोकशाहीशी काहीही संबंध नाही," असं राज ठाकरेंनी म्हटलं.

"भारतात एखाद्या मुलाला डॉक्टर होण्यासाठी एक-दोन कोटी रूपये द्यावे लागतात. मग, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर तो मुलगा दोन कोटी रूपये लुटायला सुरू करेल. या गोष्टी पूर्वी नव्हत्या. हल्ली या गोष्टी देशात वाढत आहेत. मला आपल्या देशाबद्दल वाईट बोलायचं नाही. आपला देश उत्तमच आहे. पण, आपल्याकडील व्यवस्थेचा मला राग येतो," असं मतंही राज ठाकरेंनी मांडलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com