Gurmeet Singh Kunnar : राजस्थानमध्ये काँग्रेस उमेदवाराचे निधन; 199 जागांवरच होणार निवडणूक

Assembly Election : करणपूरचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून गुरमीत सिंह कुन्नर यांनी अर्ज दाखल केला होता.
Gurmeet Singh Kunnar News
Gurmeet Singh Kunnar NewsSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Assembly Election : करणपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुन्नर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. यापूर्वी अपक्ष म्हणून विजयी होऊन मंत्री झालेल्या कुन्नर यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून ४ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल केला होता. नुकतेच त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. गुरमीत सिंह यांच्या निधनावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी शोक व्यक्त केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्विट करत गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनाच्या बातमीने मला खूप दु:ख झाले आहे. प्रदीर्घ काळ प्रकृती अस्वास्थ्य असतानाही कुन्नर हे आपल्या भागातील विकासकामांसाठी नेहमीच प्रयत्नशील होते. कुन्नर साहेबांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची आणि राजस्थानच्या राजकारणाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. दिवंगत आत्म्याला शांती आणि कुटुंबीयांना धैर्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Gurmeet Singh Kunnar News
Gram panchayat election News : निवडणुका झाल्या तरी गावपातळीवर जिरवा-जिरवीचे राजकारण !

दुसरीकडे, आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनानंतर निवडणुकीपूर्वी राजस्थानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कुन्नर यांच्या निधनानंतर आता राजस्थानमध्ये फक्त १९९ जागांवर मतदान होणार आहे. आमदार कुन्नर यांच्या मृत्यूचे कारण फुफ्फुसातील संसर्ग असल्याचे सांगितले जात आहे. आमदार गुरमीत सिंग कुन्नर यांचा मुलगा रुबी कुन्नर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी 25 बीबी घेऊन जाणार आहे, जिथे उद्या त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील.

1998 मध्ये काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर ते पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर 2008 मध्ये अपक्ष म्हणून विजयी झाले आणि पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर 2018 मध्ये निवडणूक जिंकली. गुरमीत सिंग कुन्नर यांनी 1980 मध्ये सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1988 मध्ये ते पंचायत समिती पदमपूरचे प्रमुख झाले आणि 1995 मध्ये ते उपजिल्हाप्रमुखही झाले.

Edited by : Amol Jaybhaye

Gurmeet Singh Kunnar News
Nandurbar News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे विरोधकांची पाठ तर सत्तेतल्या आमदारालाच मंचावर नाही जागा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com