Nandurbar News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे विरोधकांची पाठ तर सत्तेतल्या आमदारालाच मंचावर नाही जागा...

Nandurbar Adiwasi Program News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मानापमान नाट्य...
Nandurbar News :
Nandurbar News : Sarkarnama
Published on
Updated on

Nandurbar Adiwasi Program News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. येथील आदिवासी विकास विभागाच्या वतीन आयोजित केलेल्या जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी आदिवासी समाजाच्या विकासाबद्दल कटीबद्ध असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Nandurbar News :
Patel on pawar-Shah Meeting : प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान; आगामी विधानसभा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच लढवणार

एकीकडे हा कार्यक्रम पार पडत असताना कार्यक्रमात अवती-भोवती मानापमान नाट्य घडताना दिसले. मुख्यमंत्र्याच्या उपस्थित पार पडणाऱ्या या कार्यक्रमाकडे जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या आमदारांनी पाठ फिरवली. माजी आदिवासी विकास मंत्री आमदार के. सी. पाडवी, आमदार शिरीष नाईक, आमदार आमश्या पाडवी हे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने याची चर्चा झाली.

Nandurbar News :
महाविकास आघाडीत शरद पवार गटाला असणार सर्वाधिक जागा ? | MVA | NCP | Loksabha Election 2024

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मंचावर गावित परिवाराचा दबदबा राहिल्याचे दिसून आले. गावित कुटुंबातील सदस्य आणि निकटवर्तीय समर्थकांची या कार्यक्रमात रेलचेल होती. यामुळे गावितांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मिळवल्याचे दिसून आले. त्याच वेळी सत्ताधाऱ्यामध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे स्थानिक आमदार राजेश पाडवी यांना मंचावर स्थान दिले नसल्याचे दिसून आले. सत्ताधारी पक्षाचे आमदार पाडवी मंचाच्या समोर बसल्याने, चर्चांना उधाण आले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com