Rajasthan Assembly Elections Results 2023 : राजस्थानमधील भाजपचा विजय नेमका कुणामुळे? वसुंधरा राजेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Vasundhara Raje : राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसला खाली खेचत, भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
Vasundhara Raje
Vasundhara RajeSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Assembly Results : भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे. यामुळे आता सत्तास्थापनेसाठी भाजप दावा करणार असून, काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान भाजपचा प्रमुख चेहरा असेल्या वसुंधरा राजे यांनी प्रसारमाध्यमांना जयपूरमध्ये प्रतिक्रिया दिली.

हा विजय पंतप्रधान मोदींनी दाखवलेल्या विश्वासाचा, आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचा आहे. हा विजय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कुशल नेतृत्वाचा विजय आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं हेदेखील आहे की, हा विजय आमच्या कार्यकर्त्यांचाही आहे. त्यांचे अथक प्रयत्न, परिश्रमाचा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी दिवसरात्र परिश्रम घेत, अशाप्रकारे विजय मिळवून दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vasundhara Raje
Rajasthan Assembly Results 2023 : चार राज्यांमधून पहिला निकाल आला; भारत आदिवासी पार्टीचे राजकुमार रोत विजयी

याचबरोबर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा विजय आमच्या जनतेचा आहे. ज्यांनी काँग्रेसच्या कुशासनास नाकारत, भाजपच्या सुशासनास स्वीकरण्याचं काम केलं आहे. हा विजय २०२४मध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान करून देशवासीयांच्या सेवेसाठी संधी देण्यासाठीचा हा विजय आहे.

खरंतर यंदाच्या निवडणुकीत वसुंधरा राजे यांना भाजपकडून फारसं पुढं आणलं जात नव्हतं, शिवाय त्यांच्या बहुतांश समर्थकांनाही उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजे यांच्याव्यतिरिक्त दुसरा चेहरा शोधतोय, अशा चर्चा सुरू होत्या. अर्थात त्याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Vasundhara Raje
Madhya Pradesh Election Result 2023 : मध्य प्रदेशात पुन्हा उमललं कमळ; शिवराजसिंह चौहानांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com