Rajasthan Assembly Results 2023 : चार राज्यांमधून पहिला निकाल आला; भारत आदिवासी पार्टीचे राजकुमार रोत विजयी

Rajkumar Rota News : राजकुमार रोत हे ७० हजारांनी विजयी झाले आहेत.
Rajkumar Rota New
Rajkumar Rota NewSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Assembly Results 2023 News update : चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. राजस्थानमधून पहिला निकाल जाहीर झाला आहे.

भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार राजकुमार रोत यांचा विजय झाला आहे. ते चोरासी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे सुशील कटारा, काँग्रेसचे ताराचंद भगोरा यांचा पराभव केला आहे. राजकुमार रोत हे ७० हजारांनी विजयी झाले आहेत. या मतदारसंघात आम पार्टी पक्षानेही आपला उमेदवार उतरविला होता. आपचे शंकरलाल यांना फक्त 1914 मते मिळाली आहेत.

राजकुमार रोत - भारत आदिवासी पार्टी - 1,11,150 मते

सुशील कटारा - भारतीय जनता पार्टी - 41,984 मते

ताराचंद भगोरा - काँग्रेस - 28120 मते

Rajkumar Rota New
Rajasthan Assembly Results 2023 : गेहलोत-पायलट वादानं अर्धे काम केलं...; मोदींनी शेवटचा घाव घातला !

टोंक विधानसभा मतदारसंघातून रिंगणात असलेले काँग्रेसचे उमेदवार सचिन पायलट विजयाच्या वाटेवर आहे. 15 व्या फेरीत ते 20 हजार 532 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

राजस्थानमध्ये भाजप 119 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 64 जागांवर आघाडीवर आहे. राजसमंदच्या चारही जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्याचवेळी करौली जिल्ह्यातील तोडाभीम मतदारसंघात मतमोजणीच्या पाच फेऱ्यांनंतर काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मेहर आघाडीवर आहेत, तर डुंगरपूरच्या आसपूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय आदिवासी पक्षाचे (बीएपी) उमेदवार उमेश मीना 11411 मतांनी आघाडीवर आहेत.

Rajkumar Rota New
Rajasthan Assembly Results 2023 : मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, भाजप जिंकेल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com