Rajasthan News: सचिन पायलटांचा अल्टिमेटम् काँग्रेसने साफ धुडकावला; खर्गे-गहलोत दिल्लीत बैठक!

Congress Stand On Sachin pilot: पायलटांवर काँग्रेस कारवाई करणार?
Sachin pilot :  Mallikarjun kharge : Ashok Gahlot
Sachin pilot : Mallikarjun kharge : Ashok Gahlot Sarkarnama
Published on
Updated on

Congress Stand On Sachin Pilot: राजस्थानमधील राजकारण वेगळ्याच वळणावर आले आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी काँग्रेसला अल्टीमेटम दिलं होतं. मात्र पायलटांच्या अल्टिमेटमकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले आहे.

पायलटांनी आपल्या मागण्यांमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी संतप्त झाले आहे. यामुळे पायलटांना काँग्रेसने चर्चेसाठी किंवा त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न केले नाही. सचिन पायलट यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी गेहलोत सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. (Rajasthan News)

Sachin pilot :  Mallikarjun kharge : Ashok Gahlot
Rajasthan Congress Leader Ashok Gehlot : राजस्थानमध्ये गेहलोत बंड पुकारणार ?

काय आहेत पायलटांच्या मागण्या :

मुख्यंमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी पायलटांच्या मागण्यांबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर काँग्रेस पक्षही सचिन पायलट यांच्यापासून अंतर राखून आहे. पायलटांनी आरपीएससीची पुनर्रचना, पेपर लीक पीडितांना भरपाई आणि वसुंधरा सरकारच्या कार्यकाळातील घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.

तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी मात्र पायलटांच्या या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गेहलोत आणि दोतासारा यांना उद्या दिल्लीला बोलावले आहे.

Sachin pilot :  Mallikarjun kharge : Ashok Gahlot
Gehlot Vs Pilot : राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप? सचिन पायलट यांचा गेहलोत सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम; म्हणाले...

रंधवाच्या निशाण्यावर सचिन पायलट :

राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. जयपूरमध्ये माध्यमांशी बोलताना रंधावा म्हणाले की, "सचिन पायलट यांनी कर्नाटक निवडणुकीपूर्वी जनसंघर्ष यात्रा काढून चांगले काम केले नाही. यातून चुकीचा संदेश गेला. गजेंद्र सिंह शेखावत यांच्या संजीवनी घोटाळ्याच्या चौकशीची मागणीही पायलटने करायला हवी होती, ज्यांनी काँग्रेस सोडली. त्याची आताची स्थिती सर्वांसमोर आहे. "

Sachin pilot :  Mallikarjun kharge : Ashok Gahlot
Ashok Gehlot & Sachin Pilot Dispute : काँग्रेसची कायम डोकेदुखी ठरणारा गेहलोत-पायलट संघर्ष काय?

खर्गे यांनी गेहलोत-रंधावा यांना दिल्लीत बोलावले :

24 मे रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पीसीसी प्रमुख गोविंद सिंह दोतासारा यांना पाचारण करण्यात आले आहे. खरगे या आठवड्यात 24, 25 किंवा 26 मे रोजी दिल्लीत निवडणूक राज्यांतील प्रमुख नेत्यांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान सोबतच इतर राज्यांचे नेते देखील सहभागी होणार आहे. अद्याप तारीख ठरलेली नसली तरी. या बैठकीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा आणि सहप्रभारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत निवडणुका लक्षात घेता संघटना कशी मजबूत करायची, निवडणुकीची रणनीती काय असावी, यावर चर्चा होणार आहे. काँग्रेस हायकमांड आणि राजस्थान काँग्रेसचे प्रमुख नेते एकत्र आल्यावर सचिन पायलटांच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com