Rajasthan Politics : 'मी दावेदारी का सोडू?' गेहलोतांचं मोठं विधान, पायलटांच्या भूमिकेकडे लक्ष...

Sachin Pilot Vs Ashok Gehlot : सचिन पायलटांची नाराजी वाढू शकते...
sachin pilot : Ashok Gehlot
sachin pilot : Ashok GehlotSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Political News : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत रंगत येत आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना तूर्त तरी पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार घोषित केले नसले, तरी पुन्हा सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून गेहलोतांनी स्वत:ची दावेदारी सांगण्याचे संकेत दिले आहेत.

लोकांनी माझ्या नावावर मतदान केले तर मी दावेदारी का सोडावी? असे त्यांनी म्हटले आहे. गेहलोतांच्या या दाव्यानंतर आता काँग्रेसचे नेते सचिन पायलटांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

sachin pilot : Ashok Gehlot
BJP Vs Sambhaji Brigade News : मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून संभाजी ब्रिगेडला भाजप शहराध्यक्षांनी झापले

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गेहलोतांनी दावा केला आहे. तसेच, या वेळी राजस्थानमधील तीन दशकांची सत्ताबदलाची जुनी परंपराही बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेहलोत म्हणाले, "मला वाटतं सत्ताबदलाची या वेळी ही परंपरा नक्कीच बदलेल.

आम्ही योजना आणि राज्यात आणलेल्या प्रकल्प आणि विकासाचे खूप चांगले काम केले आहे. राजस्थान मॉडेलची चर्चा आता इतर राज्यांमध्येही होत आहे. हे एक वाळवंटी राज्य आहे, जे दुष्काळग्रस्त आणि मागासलेलेदेखील आहे. मात्र, असे असतानाही आपण विकासाचे मॉडेल बनलो आहोत."

गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारण्यात आले. तुम्ही मुख्यमंत्री आहात, पण काँग्रेसचा पुढचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? यावर गेहलोत म्हणाले, 'मुख्यमंत्रिपदावर सध्या बोलण्याची गरज नाही. आमच्या पक्षाची भूमिका हायकमांड ठरवते. हायकमांड जेव्हा कोणाच्या बाजूने निर्णय घेते. तेव्हा भविष्यात त्याला कोणी आव्हान देत नाही.

नुकतेच गेहलोत यांनी म्हटले होते की, " मुख्यमंत्रिपदाचा दावा केला नाही, तरी मुख्यमंत्रिपदच मला सोडणार नाही.' या विधानासंदर्भात गेहलोत यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, "पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हे मी कसे सांगू? माझं यापूर्वीचं विधान हे पक्षाच्या हितासाठी होते."

sachin pilot : Ashok Gehlot
Rajasthan Assembly Election : सत्ता कुणाचीही असो राजस्थानमध्ये 20 वर्षांपासून गेहलोत अन् वसुंधरा राजेंचाच जलवा

कोणाला मत द्यायचे हे लोकांना कळेल तेव्हाच पक्षाचा विजय होईल. मी काम केले आहे आणि राज्य सरकारने चांगले काम केले आहे, असे लोक म्हणत असतील आणि ते माझ्या नावावर मत देत असतील, तर मी दावेदारी का सोडेन? मी जरी मुख्यमंत्रिपदाचा दावा केला नाही तरी मुख्यमंत्री हे पद मला सोडणार नाही, असे मी जबाबदारीने म्हटले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com