BJP Vs Sambhaji Brigade News : मराठा आरक्षणाच्या भूमिकेवरून संभाजी ब्रिगेडला भाजप शहराध्यक्षांनी झापले

Maratha Reservation News : मराठा समाजाला भाजपप्रणित महायुतीचेच सरकारच आरक्षण देईल.मात्र...
BJP Vs Sambhaji Brigade News
BJP Vs Sambhaji Brigade NewsSarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे-

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत पाच हजार मराठा तरुण जात आरक्षणासाठीचा जाब विचारणार असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरमधील कार्यकर्त्यांनी जाहीर केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या या भूमिकेवर भारतीय जनता पक्षाचे नगर शहराध्यक्ष अभय आगरकर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे नगर शहराध्यक्ष अभय आगरकर हे संभाजी ब्रिगेडने जाहीर केलेल्या भूमिकेवर ते तुटून पडले आहेत. हा प्रकार म्हणजे, समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा आहे. मराठा समाजाला भाजपप्रणित महायुतीचेच सरकारच आरक्षण देईल. मात्र, यावर कोणीही राजकारणाला राजकारण आणि आडमुठेपणाचे धोरण स्वीकारू नये, असे अभय आगरकर यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP Vs Sambhaji Brigade News
Maratha Reservation : बीड जिल्हाध्यक्षांचा भाजपला घरचा आहेर; म्हणाले, ''सरकारने मराठा समाजाची...''

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्या गुरुवारी नगरच्या शिर्डी येथऊन महाराष्ट्रातील 86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ देणाऱ्या 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'ची आणि 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे.

राज्यात विकासासाठी होत असलेल्या एवढ्या मोठ्या योजनांचा प्रारंभ नगरमधून होत असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. परंतु आडमुठे धोरण घेत समाजामध्ये अस्थिरता निर्माण करणे संविधानाच्या दृष्टीने योग्य नाही. संभाजी ब्रिगेड(Sambhaji Brigade) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगर कार्यकर्त्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेचा त्यांनी पुनर्विचार करावा, असे आवाहन अभय आगरकर यांनी केले आहे.

अभय आगरकर म्हणाले, मराठा आरक्षण(Maratha Reservation) मिळावे, हीच भाजपची भूमिका राहिली आहे. राज्यातील भाजपप्रणित महायुती सरकारचीदेखील तीच भूमिका आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता न्यायालयात गेला आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकावे, यादृष्टीने महायुती सरकारचे प्रयत्न आहेत. हा कायदेशीर भाग आहे. परंतु, हा मुद्दा काहीजण तापवत आहेत. राजकारणाला राजकारण करत आहेत.

आता पंतप्रधानांच्या सभेत मराठा तरुणांना घेऊन जाऊन जाब विचारण्याची ही भूमिका म्हणजे, समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठीच आहे. हा प्रकार योग्य नाही. हा सरळसरळ आडमुठेपणा आहे. तो खपवण्याजोगा नाहीच आहे. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. (BJP Political News)

BJP Vs Sambhaji Brigade News
Dasara Melava 2023 News : शिंदेंचे सगळे मंत्री व्यासपीठावर, मग सत्तारच खाली का ?

दोन्ही उपमुख्यमंत्री कायदेशीर बाजू समजावून घेत मराठा आरक्षणावर काम करत आहेत, असे असताना समाजात अस्थिरता निर्माण करण्याच्या दृष्टीने काहींनी आडमुठेपणाची भूमिका घेणे सर्वधा चुकीचे आहे, असेही अभय आगरकर म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

BJP Vs Sambhaji Brigade News
Ajit Pawar News: अजितदादांना पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रम घेणं झालं कठीण; नेमकं कारण काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com